पंचगंगेत प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा

    29-May-2024
Total Views |
 
 
 

ganga 
पंचगंगा नदीचे प्रदूषण राेखण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक उपाययाेजनांना प्राधान्य देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी व प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना पुण्याचे विभागीय आयु्नत डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा बैठकीत दिल्या.डाॅ. पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी अमाेल येडगे, महापालिका आयु्नत के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पाेलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायु्नत दत्तात्रय लाघी, जिल्हा नगर प्रशासन सह-आयु्नत नागेंद्र मुतकेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळ, काेल्हापूर व इचलकरंजी महापालिकेचे पदाधिकारी; तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, अशासकीय सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 2014 मध्ये समिती स्थापन करण्यात आली हाेती.
 
त्यानुसार विभागीय आयु्नतांच्या अध्यक्षतेखाली सर्वच यंत्रणांचे अधिकारी समितीत असतात. पंचगंगेत प्रदूषण हाेऊ देऊ नये आणि त्यासाठी ज्या काही उपाययाेजना करण्यात येतात, त्याच्या प्रगतीचा अहवाल दर 3 महिन्यांनी सादर केला जाताे. या बैठकीत अशा सर्व दीर्घकालीन उपाययाेजनांचा आढावा विभागीय आयु्नतांनी घेतला.दीर्घकालीन उपाययाेजनांमध्ये काेल्हापूर व इचलकरंजी पालिकांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी एसटीपी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील उर्वरित काही ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया यंत्रणा बसवण्याचे काम सुरू असून, कामे संबंधित यंत्रणेकडून त्वरित पूर्ण करण्याच्या निर्देश त्यांनी दिले. प्रदूषणामुळे मासेमारीवर हाेणारा परिणाम व जैविक घटकांना येणारी बाधा, नागरी घनकचरा, पाण्याचा अतिवापर व आराेग्याच्या तक्रारींबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. तात्कालिक उपाययाेजनांत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार पंचगंगेत नव्याने काेणत्याही प्रकारे प्रदूषण हाेणार नाही व प्रदूषण करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी.