स्वाभिमानासाठी मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे

    29-May-2024
Total Views |
 
 

health 
 
 
 
शारीरिक आराेग्याबाबत आपण जेवढे जागरूक असताे तेवढे मानसिक आराेग्याबाबत बेफिकीर असल्याची वस्तुस्थिती आहे. मानसिक आराेग्यावर शारीरिक आराेग्य माेठ्या प्रमाणात अलवंबून असते याची जाणीव बहुसंख्य लाेकांना नसते. भारतात मानसिक तणाव वाढत असून, दर दहापैकी नऊ लाेक त्यांच्याबराेबर झुंजत असणे चिंताजनक आहे. स्वाभिमानाची कमतरता हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसाेपचार तज्ज्ञांचे मत आहे. या स्थितीवर मात करण्याचे प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात.चिंता काय आहेत? काेणत्याही संकटापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचे उपाय मानवाने काळानुसार विकसित केले आहेत. त्यामुळे, एखादा धाेका जाणवताच आपला श्वासाेच्छ्वास जलद हाेताे, हृदयाचे ठाेके वाढतात आणि स्नायू ताणले जातात.
 
प्रागैतिहासिक काळात अशी लक्षणे जाणवताच माणूस संकटाबराेबर लढण्यास तयार व्हायचा किंवा पळ काढायचा. आजच्या आधुनिक काळातील माणूस मात्र चिंतेच्या विळख्यात सापडताे. म्हणजे, आपण अनेकदा अकारण चिंता करायला लागताे आणि नैसर्गिक असल्यासारखे आपल्याला वाटते. आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या दिवशी हाेणार असलेली शस्त्रक्रिया किंवा नात्यातील एखाद्या मुलीची दुसऱ्या दिवशी नाेकरीसाठी मुलाखत हाेणार असेल, तर आदल्या रात्री आपल्याला त्यांच्याबाबत चिंता वाटणे स्वाभाविक असते. पण, तुम्ही सतत त्याचीच काळजी करत बसलात, तर तुम्हाला अस्वस्थता येते, घाबरल्याप्रमाणे वाटते. असे वारंवार हाेऊ लागले, तर त्याचा प्रभाव आयुष्यावर पडताे.अस्वस्थततेची काही लक्षणे अशी :
 
 भविष्याचा विचार करताना ‘काय हाेईल?’ आणि ‘कसे हाेईल?’ या सारखे विचार येणे.
 भीतीचा झटका (पॅनिक अ‍ॅटॅक) आल्यासारखी स्थिती हाेणे.
 तणाव वाढविणाऱ्या स्थितीपासून दूर जावेसे वाटणे.
 काही वाईट हाेण्याची भीती वाटणे.
 शांत राहू न शकणे.
 शांत झाेप न येणे.
 
काही जणांना लहानपणापासूनच अस्वस्थ राहण्याची सवय असते, तर काहींना त्यांच्या आई-वडिलांमुळे ही सवय लागते. नाेकरी जाणे, भूतकाळातील एखादी कटू घटना अथवा एखादे जवळचे नाते तुटण्यासारख्या घटनांमुळे चिंता अधिकच वाढते. मात्र, या सगळ्यांचा परिणाम आत्मसन्मान कमी हाेण्यावर हाेताे.चिंता आणि आत्मसन्मानाचे नाते : स्वत:ला कमी लेखण्यामुळे आत्मविश्वास घटताे आणि त्यामुळे आपण स्वत:ला इतरांबराेबरच्या याेग्यतेचे समजत नाही. या स्थितीत आपण नाकारले जाण्याची भीती वाढते.
पण, तुमच्यात आत्मविश्वास भरपूर असेल आणि तुम्ही सकारात्मक विचार करत असाल, तर इतरांचे तुमच्याबाबतचे मत काय, याची काळजी तुम्ही करत नाही. आपण लाेकप्रिय असावे, सर्वांना हवेहवेसे व्हावे अशी इच्छा असण्यात गैर काही नसले, तरी त्याचा दबाव जीवनावर पडता कामा नये.आपल्यामध्ये आत्मविश्वास कमी असल्याची तसेच आपला तणाव वाढत असल्याची काही लक्षणे अशी :  आपल्या बाेलण्यामुळे काेणाला वाईट वाटू नये म्हणून अतिसावध राहणे.
 
 लाेक काय म्हणतील याचाच विचार करणे.
 काेणाबराेबर मैत्री करणे टाळणे.
 कायम इतरांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करण