चहा पिण्याच्या अतिरेकाचे शरीरावर दुष्परिणाम

    27-May-2024
Total Views |
 
 

health 
 
भारतातील सुमारे 90 टक्के लाेक राेज सकाळी नाश्त्यापूर्वी चहा पितात. कारण जाेपर्यंत लाेक सकाळी लवकर चहा घेत नाहीत ताेपर्यंत त्यांचा दिवस अपूर्ण आहे असे त्यांना वाटते. पण चहा पिणे ही तुमच्यासाठी चांगली सवय आहे असे तुम्हाला वाटते का? या सवयीवर अनेक अभ्यास झाले आहेत, ज्यामध्ये चहा पिणे चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. कारण जास्त चहा प्यायल्याने तुमच्या पाेटालाही हानी पाेहाेचते आणि तुम्हाला अनेक गंभीर आजारही हाेऊ शकतात.
 
कुठल्याही खाण्या पिण्याच्या गाेष्टीचा अतिरेक झाला की त्यांचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर हाेतं असतात यांची जाणीव मात्र कुणीच ठेवत नाही. चहा पिल्याने आपल्याला काही वेळ अगदी मस्त वाटते परंतु चहामुळे आपल्याला काय त्रास हाेऊ शकताे, किंवा त्यांचे वाईट परिणाम कणते आहेत हे आपल्याला माहिती आहे का? आपल्या शरीरासाठी चहा एक प्रकारे हळूहळू विष निर्मितीचे काम करते.चहाची ओळख तणाव कमी करणारा अशी असली तर त्याचे जास्त सेवन केल्यास दुष्परिणाम देखील हाेऊ शकतात. जास्त चहा प्यायल्याने पाेटातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू शकते. असे झाल्यास छातीत जळजळ हाेणे, सूज येणे आणि अस्वस्थ वाटणे असे घडू शकते.
 
चहाचे अतिसेवन आईसाठी तसेच बाळासाठी हानिकारक ठरू शकते. चहाच्या अतिसेवनामुळे तुमच्या झाेपेवर परिणाम हाेऊ शकताे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये असलेले कॅफिन झाेपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटाेनिन हार्माेनमध्ये व्यत्यय आणू शकते.चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असताे जाे विशेषतः मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारातील लाेह रक्तामध्ये शाेषून घेण्यास टॅनिन प्रतिबंध करते. त्यामुळे तुम्ही जर का शाकाहारी असाल तर आपण दिवसाला किती चहा पिताे, याकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.
 
चिंता आणि तणाव वाढवणारा : चहामध्ये मुबलक प्रमाणात कॅफिन असतं आणि त्यामुळेच जास्त प्रमाणात चहा पिल्यास चिंता, तणाव आणि अस्वस्थता वाटू लागते. ब्लॅक टी मध्ये ग्रीन टी च्या तुलनेत जास्त कॅफेन असतं. तुम्ही जितका सावकाश चहा प्याल तितके त्यातील कॅफेनचे प्रमाण वाढत जाते. अभ्यासानुसार राेज 200 मिलिग्रॅम कॅफेनचा डाेस शरीरात गेला तर त्यातील बहुतेकांना चिंताग्रस्त वाटू लागते.जेव्हा चहा पिल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ किंवा तणावग्रस्त वाटू लागते, याचाच अर्थ तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त चहा पीत आहात.
 
मळमळ : चहामुळे पाेटात किंवा घशात मळमळल्यासारखे वाटू शकते. विशेषतः रिकाम्या पाेटी चहा पिल्यास ही मळमळ जास्तच जाणवते.चहामधील टॅनिन हा घटक कडवट आणि काेरडा असताे आणि त्याच्यामुळे पचनाला कारणीभूत असणाऱ्या पेशींना प्रतिबंध हाेताे आणि मग व्य्नतीला पाेटदुखी किंवा मळमळल्यासारखे वाटते. असे हाेऊ नये यासाठी चहामध्ये दूध घालावे आणि त्याखेरीज चहाबराेबर कुठलातरी पदार्थ खावा. जेणेकरून पचनश्नतीला जास्त त्रास हाेणार नाही.