काचेचे अनाेखे दीपगृह

    27-May-2024
Total Views |
 
 
 

glass 
 
फावल्या वेळेत काचांपासून विविध कलाकृती तयार करण्याचा छंद रॅण्डी रूडर यांनी जाेपासला आहे. त्यांचा नातू हॅले पास्टर याने आजाेबांनी तयार केलेले हे दीपगृह नुकतेच प्रदर्शित केले. रॅण्डी रूडर हे गेली 30 वर्षे अशा कलाकृती तयार करत आहेत. हातांनी कापलेल्या काचेच्या शेकडाे तुकड्यांचा वापर ते करतात. काेणतीही माेजमापे न घेता ते या वस्तू बनवितात. 27.5 इंच उंचीचे (70 सेंटिमीटर) दीपगृह ही रॅण्डी यांची अनाेखी कलाकृती असून, तीन वर्षांच्या परिश्रमांतून ती तयार झाली. या दीपगृहाच्या आतील बाजूला सर्पिलाकार जिना आणि टेबलखुर्च्याही आहेत.