अमेरिकेत अख्खे गाव राहते एकाच बिल्डिंगमध्ये

    27-May-2024
Total Views |
 
 

USA 
 
काेणतेही गाव एकाच बिल्डिंगचे बसू शकते, यावर काेणाचा विश्वास बसेल का? मात्र, अमेरिकेत असे घडले आहे. अलास्का स्टेटमध्ये एक गाव व्हिटियर बेगिच टाॅवर्स नावाच्या 14 मजल्यांच्या एकाच बिल्डिंगमध्ये वसलेले आहे.या गावात दाेन हजार लाेक राहतात; पण त्यांच्यासाठी पाेलीस स्टेशन, चर्च, स्कूल, शाॅपिंग माॅल, पाेस्ट ऑफिस यासारख्या सर्व सुविधा येथे आहेत.हे सर्व बेगिच टाॅवर्समध्येच एकत्रित असून, तेथे नाेकरी करणारे पण याच टाॅवर्समध्ये राहतात. बेगिच टाॅवर्स जंगलामध्ये बनवलेला असून, तिथे पाेहाेचण्यासाठी आधी अँकरेज बंदरावर जावे लागते. यानंतर बाेटीने जंगलाच्या किनाऱ्यापर्यंत पाेहाेचता येते. तिथे गेल्यावर चार किलाेमीटर एका सुरुंगामधून जावे लागते त्या वेळी या टाॅवरपर्यंत पाेहचता येते. मात्र, हा सुरुंग रात्रीच्या वेळी बंद करण्यात येताे आणि सकाळी 5 वाजता सुरू केला जाताे. बेगिच टाॅवरमध्ये आधी यूएस मिलिटरीचे सिक्रेट ऑफिस हाेते; पण 1974 पासून तेथे रेसिडेन्शियल टाॅवर बनवला गेला.