नालेसफाईत हलगर्जीपणा झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई : मुख्यमंत्री शिंदे

    27-May-2024
Total Views |
 
 

CM 
 
नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत; तसेच संबंधित यंत्रणांना नाल्यात खडक लागेपर्यंत गाळ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच ते पूर्ण केले जाईल.मात्र, या कामांत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. उचललेल्या गाळाची याेग्य विल्हेवाट लावण्याबाबतही यंत्रणांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.माॅन्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात विविध प्राधिकरणांसमवेत आढावा बैठक घेतली. नाल्यात खडक लागेपर्यंत नालेसफाई केल्यामुळे नाल्यांची खाेली वाढते. परिणामी, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह याेग्यरित्या हाेताे.
 
पावसाळ्यात मुंबईची तुंबई हाेऊ नये, यासाठी माेठ्या नाल्यांचे मुख रुंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पूरराेधक दरवाज्यांच्या सुस्थितीची पाहणी करणे, खड्डेमु्नत रस्त्यांसाठी मास्टिकचा वापर करणे, मुंबईतील संरक्षक भिंतींबाबत संबंधित प्राधिकरणांनी काळजी घेणे, भूमिगत साठवण टाक्या कार्यान्वित करणे आदी विविध सूचना बैठकीदरम्यान यंत्रणांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.यंदा सर्व प्राधिकरणांशी समन्वय साधत झिराे कॅज्युअल्टी माेहीम राबवण्यात येणार आहे. यात सर्व यंत्रणा आपापली जबाबदारी काटेकाेरपणे पार पाडून काेणतीही जीवित किंवा वित्तहानी हाेणार नाही, याची काळजी घेतील. सर्व यंत्रणांनी एकत्रित काम केल्यास काेणताही अपघात हाेणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्य्नत केला.