प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने

    25-May-2024
Total Views |
 
 

degree 
 
पदवीप्रदान समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीच्या (एनडीए) छात्रांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रबाेधिनीच्या 205 छात्रांना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची बँतलर्स पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.प्रबाेधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात झालेल्या या समारंभात धर्मशालातील (हिमाचल प्रदेश) केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संतप्रकाश बन्सल यांच्या हस्ते छात्रांना पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभात 82 छात्रांना विज्ञान शाखेची, 84 विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र आणि 39 छात्रांना कला शाखेची पदवी प्रदान करण्यात आली. नाैदल आणि हवाई दलाच्या 132 छात्रांना बी.टेक ही पदवीही प्रदान करण्यात आली.
 
या 205 विद्यार्थ्यांत 17 मित्रदेशांतील विद्यार्थ्यांचाही समावेश हाेता. या सर्व छात्रांनी उत्तम गुणांनी पदवी प्राप्त केल्याबद्दल डाॅ. बन्सल यांनी समाधान व्य्नत केले; तसेच पुढील वाटचालीसाठी छात्रांना शुभेच्छाही दिल्या.या समारंभापूर्वी छात्रांनी दीक्षान्त संचलन केले. प्रबेधिनीतील प्रशिक्षणादरम्यान हस्तगत केलेल्या लष्करी काैशल्यांचे दर्शन घडवत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.यावेळी लष्करप्रमुख जनरल मनाेज पांडे यांच्यासह प्रबाेधिनीतील सर्व अधिकारी, प्रशिक्षक व छात्रांचे पालक उपस्थित हाेते.युद्धसराव, घाेडेस्वारी, हवाई कसरती अशा विविध प्रकारांतून आपल्या काैशल्यांचे दर्शन घडवले. या प्रत्येक प्रात्यक्षिकास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.