समाजामध्ये वाढत चाललेला दिखाऊपणा कमी करण्याची गरज!

विजयकुमार आणि सुशीला मर्लेचा यांच्या लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त दै. ‌‘संध्यानंद"ने घेतलेली खास मुलाखत...

    22-May-2024
Total Views |
 
1
 
संपर्क :
विजयकुमार मर्लेचा
मोबाइल क्र. : 9225506774
 
 
संसारात वेगवेगळ्या टप्प्यांवर परिस्थिती बदलत असते, त्यात चढ-उतार येतातच; पण पती-पत्नीने ती सामंजस्याने स्वीकारून त्यावर एकमेकांच्या विश्वासाने मात करणे, हेच खऱ्या संसाराचे यश आहे. 50 वर्षे ‌‘जीवनसाथी'बरोबर सुखा- समाधानात घालवणे आणि लग्न-कुटुंब व्यवस्थेवरील भारतीय आणि जैन संस्कारांचे पालन करणे, हे कर्तव्य समजणाऱ्या विजयकुमार आणि सुशीला मर्लेचा यांच्या आज (22 मे) रोजी लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त दैनिक ‌‘संध्यानंद'च्या वरिष्ठ उपसंपादक मिलन म्हेत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा काही अंश खास वाचकांसाठी सादर करीत आहोत...
 
प्रश्न : राजस्थानातून पुण्यात कधी आलात, राजस्थानात मूळचे कुठले आणि जन्म, शिक्षण, शिक्षण कोणत्या परिस्थितीत झाले? विजयकुमारजी : माझा जन्म पुण्यात 6 जुलै 1954 ला गणेश पेठेत झाला. गणेश पेठेत एक शंभर कुटुंबांचा सातव वाडा होता. येथे सर्व जाती-धर्माचे लोक राहत होते. याच वाड्यात एका छोट्या खोलीत आम्ही राहत होतो. वडिलांचे नाव मोतीलाल ताराचंद मर्लेचा आणि आईचे कांताबाई...! मी त्यांचा एकुलता एक मुलगा. गणेश पेठेतील अग्निहोत्री स्कूलमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले आणि त्यानंतर राजा धनराज गिरीजी हायस्कूल रास्ता पेठ येथे 11 वी पर्यंत शिक्षण झाले. त्यावेळी 11 वी एसएससी होती. यानंतर गरवारे कॉलेज ऑफ कॉर्स येथून बी.कॉ. केले, लॉ करून वकील होण्याचे माझे स्वप्न होते. ‌‘लॉ' मध्ये मला करिअर करण्याची इच्छा होती. त्यासाठी ॲड. बाबासाहेब भिडे यांचे अर्ग्युेंट ऐकण्यासाठी जात होतो. सिम्बायोसिस कॉलेजमध्ये ‌‘लॉ'साठी प्रवेशही घेतला. एक वर्ष पूर्ण झाले; पण त्यानंतर लग्न झाले आणि शिक्षण थांबले.
 
प्रश्न : राजस्थानातून पुण्यात कधी आलात आणि तुचा पिढीजात व्यवसाय कोणता होता?
विजयकुमारजी : सुारे शंभर वर्षांपूर्वी माझे आजोबा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत जवळील खुटबाव या गावी राजस्थानातील दुधोर गावातून आले. खुटबाववरून माझे वडील पुण्यात आले. त्यांनी सुरुवातीला एक खासगी नोकरी केली. यानंतर काही काळाने त्यांनी सिमेंटचा व्यवसाय सुरू केला. या वेळी ‌‘एसीसी' ब्रॅण्डच्या सिमेंटला अधिक मागणी होती; पण त्याचे शॉर्टे जही खूप होते. सुारे 20 वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला. 1974 मध्ये त्यांचा हा व्यवसाय बंद झाला. यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी गणेश रोड (रविवार-बुधवार पेठ), सावतामाळी भुवन, फडके हौदाजवळ ‌‘विजय क्लॉथ एम्पोरियम' या नावाने माझे ‌‘कझिन' जिजाजी पारसमल बोथरा आणि मी असे आम्ही दोघांनी कपड्याचे दुकान सुरू केले.
 
 

2 
 
प्रश्न : आपले लग्न कधी झाले, त्यावेळी घरची स्थिती कशी होती, माहेर कुठे आहे आणि बहीण-भाऊ किती आहेत?
सुशीलाजी : 22 मे 1974 ला लग्न झाले आणि त्यानंतर जून महिन्यात आमचा कपड्याचा व्यवसाय सुरू झाला. माझे माहेर मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील लालबाग भागात आहे. माझे माहेर मूळचे जळगावजवळील उत्तराणचे. माझे वडील तेथून बुऱ्हाणपूरला शिफ्ट झाले होते. वडील भागचंदजी संघवी आणि आई गेंदाबाई. मला एक मोठा भाऊ आहे- प्रवीणचंद संघवी. आठवीपर्यंत लागबाग उच्च माध्यमिक स्कूलमध्ये माझे शिक्षण झाले. माहेरची घरची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली आहे. तीन दिवस त्यावेळी आमचा लग्नसोहळा सुरू होता. पुण्यात आल्यावर तर खूपच छान वाटले. बुऱ्हाणपूरपेक्षा पुणे खूपच चांगले आहे.
 
प्रश्न : लग्नाच्या वेळची काही विशेष आठवण असेल तर सांगाल?
विजयकुमारजी : बुऱ्हाणपूणमध्ये लग्न खूपच दिमाखात झाले. लग्न घराबाहेर असलेल्या मांडवात झाले होते; पण तिथे एक कापसाची मिल आहे. तेथे सुारे तीन दिवस वऱ्हाडाला राहण्यासाठी जागा दिली होती. आपल्याकडे जसा हापूस आंबा प्रसिद्ध आहे, तसा बुऱ्हाणपूर परिसरात लंगडा जातीचा आंबा प्रसिद्ध आहे. संपूर्ण वऱ्हाडासाठी तीन दिवस आमरस, पंचपक्वान्नांचे जेवण होते. माझे पत्नीचे माहेर आमच्यापेक्षा खूपच धनवान होते. त्यांची हवेली होती, तर माझे 10 बाय 10 चे छोटे घर होते. माझे सासरे आणि आतेसासरे पुण्यात घर पाहायला आले तेव्हा आतेसासरे म्हणाले होते, या मुलाकडे तर काहीच नाही, इथे कसे मुलीला द्यायचे? पण सासरे म्हणाले की, हाच मुलगा काही वेगळे करून दाखवणार आहे, हा त्यांचा विश्वास खूप मोठा होता. याबरोबरच एक मोठी आठवण या लग्नाबाबत आहे. 1974 च्या दरम्यान रेल्वेचा मोठा संप झाला होता. बुऱ्हाणपूरला लग्नाला जाण्यासाठी आम्ही सुारे 250 लोकांचे बुकिंग केले होते आणि संपामुळे रेल्वे रद्द झाली. यावेळी बसचे पण शॉर्टेज होते; पण मुंबईहून नेहमीच्या दरापेक्षा अधिक दहा हजार त्यावेळी देऊन तीन एसटी बस पुण्यात आणल्या होत्या. यासाठी माझ्या वडिलांचे मित्र होते मोहनशेठ नवलखा आणि मोहनशेठ गादिया, त्यांची खूपच मदत झाली. संपूर्ण वऱ्हाड तीन बसने औरंगाबाद रोडने बुऱ्हाणपूरला गेले. यावेळी वऱ्हाडाला अजंठा-वेरूळची ट्रीपही घडवली होती. संपूर्ण वऱ्हाड खूश झाले होते.
 
प्रश्न : त्यावेळी सोन्याचे भाव साधारण किती होते आणि तुच्या लग्नाला किती खर्च आला होता?
विजयकुमारजी : आमचे लग्न झाले तेव्हा 80 रुपये तोळा (दहा ग्रॅ) सोने होते; माझ्या सासुरवाडीचे लोक मुळातच श्रीमंत होते; पण माझ्या वडिलांनी मोतीलाल मर्लेचा यांनी त्यावेळी माझ्या आईसाठी आणि माझ्या पत्नीसाठी एकसारखे दागिने एकाच वेळी प्रत्येकी 100 तोळे सोन्याचे माझ्या लग्नात केले होते. लगनासाठी मुंबईहून बस आणणे, बुऱ्हाणपूरला वऱ्हाड नेणे-आणणे आणि इतर सर्व असे मिळून सुारे 10 लाखांचा खर्च त्या काळात झाला होता.
 
 

3 
 
प्रश्न : बुऱ्हाणपूरहून लग्न होऊन पुण्यात आल्यावर काही समस्यांना सामोरे जावे लागले का? मुलांचे जन्म आणि शिक्षण कसे झाले? सुशीलाजी : बुऱ्हाणपूरला घर मोठे होते; पण इथे आल्यावर 10 बाय 10 ची लहान खोली. त्यात सासू-सासरे आणि आम्ही दोघे; पण काहीच वाटले नाही. कारण सगळ्या गोष्टी सहजपणे स्वीकारायचे संस्कार आई-वडिलांकडून झाले होते, त्यामुळे या छोट्या घरात पण समाधान मिळत होते. यानंतर आमच्या घरात मुलगी नूतन हिचे 1976 मध्ये आणि मुलगा उपेश याचे 1978 मध्ये आगमन झाले. दोघांचेही प्राथमिक-माध्यमिक शिक्षण शिवाजी मराठा हायस्कूलमधून झाले. मुलीचे आताचे नाव नूतन योगेश चुत्तर आहे, ती चिंचवडला असते. गरवारे महाविद्यालयातून तिने बी.कॉ. केले आहे आणि मुलगा उपेश याने ‌‘एसएसपीएमएस'मधून बीई-इलेक्ट्रिकल केले आहे. त्याने यानंतर केटरिंगमध्ये करिअर केले आणि त्याच्या शिक्षणाचा खर्चही त्याने त्यातूनच केला. उपेश आता ‌‘सुकांता' हे पुण्यातील नामवंत हॉटेल सांभाळतो आहे. माझी सून डॉ. लकीशा ही पण एम.डी. (होमिओपॅथिक) आहे. ‌‘जितो' लेडिज विंगची ती चेअरमन आहे, या माध्यमातून तीही खूप सामाजिक कार्य करते आहे.
 
प्रश्न : मुलांचे बालपण आणि शैक्षणिक जीवन कसे गेले? व्यापारात काही बदल झाले का?
विजयकुमारजी : गणेश पेठेत आमचे घर खूप लहान होते. 100 घरांचा उंबरठा असलेला आमचा वाडा होता. राहण्यासाठी-खेळण्यासाठी फार जागा नव्हती. मात्र, याच परिस्थितीत मुलांनी अभ्यास केला. शिवाजी मराठा शाळेत मुलांची ॲडमिशन घ्यायलाही त्यावेळी पैसे नव्हते; पण मुलं खरंच लहानपणापासूनच हुशार होती. उपेशच्या जन्माच्या वेळची एक सुंदर आठवण आहे. खरोखर तो देवाचा चमत्कारच होता. त्यावेळी ‌‘टेलिग्राम' यायचे. त्याच्या जन्माचा ‌‘टेलिग्राम' येण्याआधी काही सेकंद माझ्या घराला ‌‘परिसस्पर्श' झाल्यासारखा अनुभव आला आणि दाराची कडी वाजली. मुलगा झाल्याचा टेलिग्राम आला. 1974 ते 1984 या दहा वर्षांच्या काळात ‌‘विजय क्लॉथ एम्पोरियम' चालवले; पण त्या काळात ‌‘लॉस'च अधिक झाला. लक्ष्मी रोड जवळ असल्याने खरेदीसाठी इथे कमी लोक यायचे, त्यामुळे ‌‘लॉस' काय असतो, याचा अनुभव मी घेतला आहे.
 
 

4 
 
प्रश्न : सामाजिक कार्यात कसे सहभागी झालात?
विजयकुमारजी : वाड्यात राहायची 35 वर्षे सवय होती. आजूबाजूला ‌‘कॉस्मोपॉलिटिन' वातावरण होते, यामुळे प्रत्येकाचे सुख-दुःख माहीत होते. शेजारी-पाजारी हेच आपले नातेवाईक. त्यांच्या प्रत्येक प्रसंगात मी काम केले, म्हणजेच माझे सोशल वर्क इथूनच सुरू झाले आणि 1984 मध्ये मी ‌‘एमएलसी'चा इलेक्शनचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला. माझ्या विरोधात काँग्रेसचे प्रकाश ढेरे आणि जनता दलाचे भाई वैद्य होते. माझे चिन्ह त्यावेळी स्वस्तिक होते. माझे राजकीय मित्र राजेंद्र सुराणा यांनी त्यावेळी ‌‘प्रमोट' केले. यावेळी दीड किलोीटरची प्रचारयात्रा निघाली होती.
 
प्रश्न : व्यापाराव्यतिरिक्त अनेक संस्थांशी आपण जोडले गेलेले आहात, अशावेळी कुटुंबाला वेळ कसे देता?
विजयकुमारजी :वयाच्या 20 व्या वर्षांपासूनच समाज कार्य सुरू केले होते. कुटुंबाकडे मात्र कधी दुर्लक्ष केले नाही. मुलगा उपेश जसा हाताशी आला तसा मला खूप वेळ मिळू लागला. मी नशीबवान आहे, उपेशने खूप लवकर कामात लक्ष घातले. सुरुवातीपासूनच मी कुटुंबाला वेळ देत आलो आहे. कपड्याचे दुकान होते, त्यावेळी सो वारी दुकान बंद असायचे. यावेळी पत्नीबरोबर खूप चित्रपट पाहिले, तो आम्हा दोघांनाही एक छंदच होता.
 
प्रश्न : पती कामात व्यस्त आणि आर्थिक परिस्थिती कठीण अशा काळात त्यांना कशी साथ दिलीत? या काळात नातेवाइकांबरोबरची एखादी विशेष आठवण सांगा.
सुशीलाजी : जशी परिस्थिती समोर आली तसे त्याला सामोरे जाण्याचे संस्कार आधीपासूनच होते. त्यामुळे फार अवघड गेले नाही. आहे त्या परिस्थितीत आनंदाने, समाधाने राहणे एवढेच माहीत होते. सासू-सासरे, दोन मुले आणि छोटे घर या परिस्थितीत खर्चापासून अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागत होते. मी तसे मोठ्या घरातून आले होते; पण इथेही काही कमी पडू दिले नाही. परिस्थिती आपल्याला सगळं शिकवते. एकदा दुकानात गेले होते. त्यावेळी कर्ज, देणी खूप होती. एक व्यक्ती पैसे घेण्यासाठी आली होती. काही काळाने पैसे देतो असे विजयजी सांगत होते; पण तो ऐकत नव्हता. आत्ता पैसे नाहीत, असे सांगितले तेव्हा तो म्हणाला यांच्या हातात तर सोन्याच्या बांगड्या आहेत. यावेळी यांनी मला सांगितले की, बांगडी काढून त्याला दे... मी ते लगेच केले... काहीच वाटले नाही... कारण ती व्यक्ती ज्या पद्धतीने बोलत होती, ते वाईट होते आणि नवऱ्याच्या मदतीला जाणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्यच असते. ‌‘जीवनसाथी' हाच जीवनाचा खरा आधार असतो. दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत हलाखीची स्थिती असली, तरी माझ्या सासूबाईंनी बिबवेवाडीत त्यावेळी 2 हजार स्क्वे.फू.चा प्लॉट 5 हजार रुपयांत घेऊन ठेवला होता. त्यावर आता बंगला बांधला आहे. 10 बाय 10 च्या जागेतून एकदम बंगल्यात राहायला आलो आहेत, यामुळे माझ्या माहेरी आनंदच झाला. माझ्या वडिलांचा निर्णय चुकला नव्हता, याचे समाधान आहे.
 
 

5 
 
प्रश्न : वयानुसार आपली दिनचर्या कशी आहे? अजूनही व्यापार-समाजकारण-राजकारण यात ॲक्टिव्ह आहात का? विजयकुमारजी : हो. अजूनही व्यापार, समाजकारण यात व्यस्त आहे. मला झोप खूप प्रिय आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणे वगैरे होत नाही; पण जैन आचरणाप्रमाणे ‌‘चौविहार'वर माझा विश्वास आहे. काही काळापूर्वी मला डॉक्टरांनी ॲन्जिओग्राफी करण्यास सांगितले होते; पण त्यानंतर मी सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता साधे जेवण घेण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे माझ्या आरोग्यात खूप सकारात्मक बदल झाला. माझे आजही शाळा-कॉलेजपासूनचे मित्र आहेत. महिन्यातून एकदा तरी त्यांना भिशीच्या निमित्ताने भेटणे आणि मजेत दिवस त्यांच्याबरोबर घालवणे मला आवडते. दुपारी 2 वाजता मी ‌‘सुकांता'वर जातो आणि 4.30 ला परत येतो. दिवसाचे काम सुरू करण्यापूर्वी मी बालाजीनगरमध्ये येथे माझ्या चुलत भावाच्या घरी असलेल्या ‌‘राम सा पीर' (रामदेवबाबा - रुणेचा धाम) यांचे दर्शन 25- 30 वर्षांपासून घेतो. दिवसा अगदीच जमले नाही तर रात्री तरी दर्शन घेणारच, त्यावर माझा विश्वास आहे. याशिवाय ॲन्टी करप्शन कमिटी, मुंबई-दिल्ली (राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऋषी आनंदवन हडपसर, जय आनंद ग्रुप (अध्यक्ष-महाराष्ट्र), वंचित विकास पुणे (कार्याध्यक्ष), महावीर फूड बँक (अध्यक्ष) साईबाबा संस्थान, शिर्डी (सदस्य), श्री लक्ष्मी को-ऑप बँक पुणे (चेअरमन-अध्यक्ष), जैन प्रकोष्ट महाराष्ट्र राज्य (प्रदेश उपाध्यक्ष) अशा अनेक समित्यांवर काम करतो आहे. ऋषी आनंदवन हडपसर येथे उपाध्याय प्रवर प्रवीणऋषीजी म.सा. यांच्या प्रेरणेने पर्यावरण रक्षणाचे काम केले आहे. 24 तीर्थंकरांना ज्या झाडांखाली केवलज्ञान प्राप्त झाले त्या झाडांचे रोपण-संवर्धन करून ‌‘तीर्थंकर विहार'ची निर्मिती केली आहे. ब्लड डोनेशन आणि गरीब- गरजूंना धान्यवाटप समाजासाठी या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
 
प्रश्न : सध्याच्या पिढीसाठी काही विशेष संदेश?
विजयकुमार-सुशीलाजी : अलीकडे अनेक गोष्टींम ध्ये दिखावेपणा आला आहे. तो कमी करण्याची गरज आहे. लग्न सोहळ्यासारख्या ठिकाणी 60- 60 पदार्थ ठेवले जातात. याची खरंच गरज नाही. उधळपट्टी कमी करता येणे सहज शक्य आहे. युवा पिढीने सामंजस्याने वागण्याची गरज आहे. त्याचबरोबर पालकांनी पण त्यांना ‌‘फ्री-हॅण्ड' देणे आवश्यक आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवावे; पण त्यांच्या नवीन योजनाही समजून घेऊन त्याप्रमाणे काम करण्याची त्यांना मुभा द्यावी. मुलींनी विशेषतः खूप अपेक्षा न ठेवता संसाराच्या एकीकारणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. डिजिटायजेशन ही काळाची गरज आहे; पण त्याचे धोकेही लक्षात घेणे आवश्यक आहे. शेजारी-पाजारी जे असतील त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झाले पाहिजे, त्यामुळे सम ाज एक राहण्यास मदत होते. एखादेवेळी पैशाची मदत करणे शक्य नसते; पण मॉरल सपोर्ट सहज करता येतो. ‌‘विविधतेत एकता' आहे, त्यामुळेच देश एक परिवार ही संकल्पना सगळ्यांनी लक्षात ठेवावी. त्यासाठीच आपण शाळेत म्हणत असलेली ‌‘प्रतिज्ञा' ही आपली संस्कृती ठरली आहे.