डॉ. अनिर्बन सरकार करणार आयएसीसीआयएचे प्रतिनिधित्व

    22-May-2024
Total Views |

dr 
 
पुणे, 21 मे (आ.प्र) :
 
डॉ. अनिर्बन सरकार यांना इंटरनॅशनल काँग्रेस फ्रॉम डेव्हलपमेंट टू कन्स्ट्रक्शन इन लिबिया (सीआयडीसीएल) या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हम्मामेट सिटी-ट्यूनिशिया येथे सीआयडीसीएलच्या आगामी परिषदेत ते इंडिया अँड अरब कंट्रीज चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (आयएसीसीआयए) चे प्रतिनिधित्व करतील. ही परिषद 24 ते 26 मे 2024 या कालावधीत होणार आहे. डॉ. अनिर्बन सरकार हे आयएसीसीआयएचे अध्यक्ष आहेत. याव्यतिरिक्त, ते डेक्कन ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीरीत्या भरभराटीचा व्यवसाय चालवत आहेत. बांधकाम क्षेत्रातील सेवा आणि नवकल्पना जाणून घेण्यासाठी उखऊउङ ने बांधकाम, कंत्राटी आणि सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात रुची असलेल्या मान्यवरांना आणि व्यक्तींना आमंत्रित केले आहे. हे व्यासपीठ सहभागींमधील नेटवर्किंग आणि परस्परसंवादासाठी एक आदर्श वातावरण, तसेच व्याख्याने आणि संबंधित विषयांवर चर्चा करणाऱ्या मंचांना उपस्थित राहण्याची संधी प्रदान करेल. या परिषदेमुळे भारतीयांना औद्योगिक क्षेत्रात व्यवसायवृद्धी आणि रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.