जुने रस्ते, पूल आणि इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

    22-May-2024
Total Views |
 
 

Audit 
पावसाळ्यात पुरामुळे बाधित हाेणाऱ्या ठिकाणी; तसेच दुर्गम गावांत जलद मदत पाेहाेचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियाेजन करावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान खात्याचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे; तसेच जुने रस्तेपूल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश विभागीय आयु्नत डाॅ. निधी पाण्डेय यांनी येथे दिले.माॅन्सूनपूर्व तयारीबाबत अमरावती विभाग आढावा बैठक विभागीय आयु्नत डाॅ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बाेलत हाेत्या.अमरावती जिल्हाधिकारी साैरभ कटियार, अकाेला जिल्हाधिकारी अजित कुंभार, बुलडाणा जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील, यवतमाळ जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयु्नत, निवासी उपजिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित हाेते.
 
उपायु्नतसंजय पवार, गजेंद्र बावणे, सहायक आयु्नत श्यामकांत मस्के यांच्यासह दूरसंचार विभाग, भूजल सर्वक्षण यंत्रणा, महावितरण, जलसंपदा विभागाचे प्रादेशिक प्रमुख, प्रतिनिधी बैठकीस उपस्थित हाेते.पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने माॅन्सूनपूर्व तयारी आपापल्या जिल्ह्यात करावी. पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टी व पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा, धान्यपुरवठा करण्यासाठी नियाेजन करावे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी जलस्राेतांची गुणवत्ता तपासण्याबराेबरच आवश्यक तेथे पर्यायी व्यवस्था करावी.पाऊस, वादळाप्रसंगी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्वनियाेजन करून सेवा पुरवावी. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याचीखात्री संबंधित विभागाने करावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीजयंत्रे तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत.
 
आपत्कालिन परिस्थितीसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विभागीय आयु्नतांनी दिले.
जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित; तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी माेटरबाेट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग्ज, राेपबंडल, सर्चलाइट, मेगाफाेन, ग्लाेव्हज, रेनकाेट, स्कूबा डायव्हिंग किट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची माॅकड्रिल, संरक्षित निवारा व भाेजनव्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी अ‍ॅप, नदीनाल्यांची सफाई-खाेलीकरण आदी बाबींसंदर्भात संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच पूर्वतयारी करून घ्यावी. वेळाेवेळी आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयु्नतांनी दिल्या आहेत.