सेवानिवृत्त प्राध्यापकांसाठी कृतज्ञता सोहळा

    21-May-2024
Total Views |
 
retire
 
पुणे, 20 मे (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुण्यातील खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राध्यापकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा व्होकेशनल बॅच 1998च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने संस्थेच्या हॉलमध्ये संपन्न झाला. या कृतज्ञता सोहळ्याच्या प्रारंभी सेवानिवृत्त प्रा. डॉ. श्रीपाद ढेकणे, प्रा. पंडित होले व प्रा. शैलेश सोनार यांचे विद्यार्थिनींनी औक्षण केले. त्यानंतर माननीय प्राध्यापकांनी दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन केले. व्यासपीठावर सर्व सेवानिवृत्त प्राध्यापक सहकुटुंब, तसेच प्रमुख पाहुणे प्रा. बाळासाहेब थोरात, प्रा. मुरकुटे, प्रा. रास्ते स्थानापन्न होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त प्राध्यापकांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर सेवानिवृत्त प्राध्यापकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आभार व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्राध्यापकांना चांदीची श्रीगणेशमूर्ती आणि दिपंकर गायकवाड यांच्या वतीने भारताचे संविधान हे पुस्तक सप्रेम भेट दिले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अविनाश सरोदे, विराज रोकडे व साधना रच्चेवार यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिपंकर गायकवाड, विनायक घुले, उदय सोनवणे, सागर चौधरी, हरिष भोसले, गोकुळ पवार, रूपाली निमकर, निवेदिता भोसले, सुवर्णा रोकडे यांनी परिश्रम घेतले.