वाढत्या महागाईतही मध्यमवर्ग करताे आहे मजा

    19-May-2024
Total Views |
 
 

thoughts 
 
व्हेकेशन मध्ये आता प्रवास व्हिएतनाम, दुबई, सिंगापूर, युराेपचा हाेताे आहे. एअरपाेर्टवर आता स्टेट ट्रान्सपाेर्ट बस स्टेशनसारखी गर्दी दिसू लागली आहे. महिलाही आता कमावतात त्यामुळे त्यांचेही शाॅपिंग आणि प्रवास वाढला आहे. महागाई आता निवडणुकीचा मुद्दा राहिलेला नाही. धार्मिक स्थळांच्या प्रवासात वाढ झाली आहे. विदेशातून येणारे भारतीय ही येथील मध्यम वर्गीयांची माैजमजा पाहून आश्चर्य करीत आहेत.आतापर्यंत भारतात दाेन प्रकारचे लाेक असत. एक असे ज्यांच्याकडे सर्व खूप हाेते आणि दुसरे ज्यांच्याकडे काहीही नव्हते. पण गेल्या वीस वर्षात तिसरा वर्ग भारतात अस्तित्वात आला आहे.हा तिसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे खूप मिळवण्याची क्षमता नाही, तरीही खूप मिळवण्याच्या मार्गावर ताे आहे. हा आहे मध्यमवर्ग.
 
ल्नझरी वस्तू आजही तित्नयाच महाग आहेत पण या वस्तू मध्यम वग जरूरीच्या वस्तूंच्या वर्गात टाकताे आहे. हा वर्ग इतका बिनधास्त हाेत चालला आहे की, क्रेडिट कार्ड व हप्त्याने जे हवे ते ताे मिळवताे. मजुरी करून जगणारा कष्टकरी वर्ग तर अडचणीत आहे, पण मध्यमवर्ग आणि पगारदार वर्ग यांना अर्थशास्त्राचे नियम लागू हाेत नाहीत.सारेच मिळवण्यासाठी त्याची आगेकूच चालू आहे. जगातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, सरकारचे मुक्त धाेरण, व्यापारी उद्याेगपतींची राेजीराेटी या मध्यम वर्गामुळेच चालू आहे. आजचा मध्यम वर्ग 3500 बाटल्या थंड पाणी पिताे. 16,500 टन टाल्कम पावडर एक वर्षात त्यांच्या चेहऱ्याला लावताे. 450 टन बटाटा चिप्स खाताे. वर्षात 1.60 कराेड मध्यमवर्गीय यात्री विमान प्रवास करतात.
 
मध्यमवर्गीयांची खरेदी पाहण्यासारखी आहे. आज भारतामध्ये 19 काेटी टी व्ही सेट्स, 7 काेटी कार, 71 काेटी टू व्हीलर, 60 लाख वाशिंग मशीन, 1.5 अब्ज सेल फाेनची विक्री हाेत आहे. यात 89 टक्के ग्राहक मध्यमवर्गातील आहेत.मध्यमवर्गीय रहिवासी असलेल्या भागात असलेल्या इलेक्ट्राॅनिक दुकानाचा मालक म्हणताे, सध्या मध्यमवर्गीय जेवणाखाण्यासाठी पैसा कमावत नाहीत.
प्रत्येक नागरिक फ्रीज, टी.व्ही., वाॅशिंग मशीन, हाॅटेलिंग, कार, ए.सी.साठी कमावताे आहे.बहुतेक लाेकांचा पगार वस्तूंची खरेदी करण्यातच जाताे. बचत हाेत नाही.मध्यमवर्गीय म्हणतात शेअर बाजारात पैसे गुंतवले तर कंपनीचा परफाॅर्मन्स खराब झाला, पाेस्ट आणि बँकेत पैसे ठेवले तर व्याजाचा काही भराेसा नाही.त्यामुळे माैजमजेत बेफिकीर झालेला मध्यमवर्गीय म्हणताे, हप्त्यावर घेतलेल्या वस्तू कंपनीने परत नेल्या तरी हरकत नाही. जितक्या दिवस वापरल्या तितके दिवस मजा केली. भारतातील लाेकांपैकी 60 काेटी लाेक मध्यम वर्गात येतात.
(क्रमश:)