मियामी पाेलिसांच्या ताफ्यात गस्तीसाठी राेल्स राॅयस कार

    19-May-2024
Total Views |
 
 


miami
 
 
 
मियामी बिच पाेलिसांच्या ताफ्यात दाखल झालेल्या एका गाडीने सर्वांचे लक्ष सध्या वेधून घेतले आहे. ही गाडी राेल्स राॅयस असून, तिची किंमत आहे 2 लाख 50 हजार डाॅलर (सुमारे 2 काेटी 8 लाख 74 हजार 437 रुपये). या गाडीचा गस्तीसाठी वापर केला जाताे आहे.तरुणांनी पाेलीस दलात दाखल व्हावे म्हणून या गाडीचा वापर केला जात असून, आलिशान माेटारींचे विक्रेते असलेल्या ब्रामन माेटर्सकडून ही राेल्स राॅयस घेण्यात आली आहे. गस्तीची गाडी (पेट्राेलिंग कार) म्हणून ती वापरली जाते. ‘स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मियामी बीच पाेलीस दल सदैव कार्यरत असते. तरुणांनी पाेलीस दलात दाखल व्हावे म्हणून आम्ही ब्रामन माेटर्सच्या साैजन्याने ही गाडी घेतली आहे,’ असे मियामी पाेलीस दलाने ‘ए्नस’वरील मेसेजमध्ये म्हटले आहे. माेटरसायकलवर स्वार झालेल्या पाेलिसांसाेबत ही गाडी सायरन वाजवत आणि दिवे झळकावत गस्तीचे काम करत असल्याचा व्हिडिओसुद्धा टाकण्यात आला आहे.
 
‘सध्या पाेलीस दलात भरती हाेण्याचे तरुणांचे काम कमी झाल्याने आम्ही या गाडीच्या माध्यमातून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताे आहाेत,’ असे मियामी बीच पाेलीस दलाचे प्रमुख वेन जाेन्स यांनी सांगितले.गस्तीसाठी पाेलिसांच्या ताफ्यात दाखल झालेल्या या राेल्स राॅयसवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हे फक्त मियामीमध्येच घडू शकते असे एकाने म्हटले आहे, तर एवढी महाग गाडी घेणे म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचे दुसरा म्हणताे. मात्र, 2012मधील ही गाडी विनामूल्य वापरासाठी पाेलिसांना देण्यात आल्याने करदात्यांवर बाेजा पडणार नसल्याचा खुलासा पाेलिसांनी केला आहे.ब्रामन माेटर्सतर्फेच या गाडीचा इंधन खर्च आणि देखभाल केली जाणार असून, ही गाडी ताब्यात असताना काही अपघात घडला तर मात्र पाेलिसांना खर्चाची भरपाई करावी लागेल, असे वृत्त ‘मियामी हेरल्ड’ने दिले आहे.