वेब डिझायनरचे शानदार करिअर करा

    17-May-2024
Total Views |
 
 
 

web 
असे म्हणता येईल की, वेब डिझायनर हा काेणत्याही वेबसाइटचा आर्किटे्नट, इंजिनियर, निर्माता आणि डिझायनरही असताे. येथे ब्रश व पेंटऐवजी प्निसल व माउस ही त्याची अवजारे असतात. त्यामुळे डिझायनिंग माहितीतंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. विशेष म्हणजे यांची मागणी भावी काळात वाढणार आहे.
 
विविध प्रकारचे काेर्स : डिप्लाेमा इन ग्राफिक अँड डिझाइन, डिप्लाेमा व सर्टिफिकेट काेर्स इन वेब डिझाइन अँड वेब प्राॅड्नशन, बीएससी इन मल्टीमीडिया, सर्टिफिकेट इन वेबसाइट डिझाइन अँड मॅनेजमेंट, अ‍ॅडव्हान्स्ड सर्टिफिकेशन इन वेब डिझाइन अँड इंटरअ‍ॅ्निटव्ह मल्टीमीडिया, ग्राफिक अँड वेब डिझाइन शाॅर्ट टर्म काेर्से स, डिप्लाेमा इन अ‍ॅडव्हान्स्ड लेव्हल वेब डिझायनिंग , वेब डिझायनिंग अँड वेब प्राॅड्नशन असे काेर्स करवले जातात.या काेर्सचा कालावधी तीन महिने ते तीन वर्षे असताे.
 
काय असते डिझायनरचे काम : वेबसाइट आकर्षक रूपात एक कुशल डिझायनरच करू शकताे. वेबसाइटचा लुक उत्तम असायला हवा. कारण फ्रंट पेजच वाचकांना आकर्षित करण्याचे काम करीत असते. डिझायनिंगच्या कामासाठी ज्यांना नव्या ट्रेंडनुसार वेबसाइटचे डिझाइन करणे व त्यात कंटेंट मांडणे येते तेच लाेक उपयुक्त असतात.कुशलता ही या क्षेत्रातील यशाची पहिली पायरी आहे.
 
शैक्षणिक याेग्यता : शैक्षणिक याेग्यतेविना करिअरचा मार्ग अपूर्ण असताे. बॅचलर डिग्रीत प्रवेशासाठी काेणत्याही फॅकल्टीतून 50 टक्के बारावी पास हाेणे आवश्यक असते. सर्टिफिकेट, डिप्लाेमा व पाेस्ट ग्रज्युएट डिप्लाेमाही यात करता येऊ शकताे. विशेष म्हणजे यात आर्ट्स, काॅमर्स व सायन्स अशा काेणत्याही फॅकल्टीतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकताे.
 
काेठे आहेत संधी : वेब डिझायनरला सुरुवातीचा पगार 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत असताे. अनुभव, कार्यक्षमता व दक्षतेच्या आधारावर वाढ हाेत राहते. विशेष म्हणजे स्वयंराेजगाराच्या दृष्टीनेही हे खूप उत्तम आहे. एक वेब डिझायनर व डेव्हलपर्सच्या रूपात स्वत:ची कंपनी सुरू करून लाखाे रूपये कमावता येऊ शकतात. फ्रीलान्स डिझायनर म्हणूनही काम करू शकतात. तसेच या क्षेत्रात निरनिराळ्या वेबसाइट कंपन्या आपल्या डिझाइनर्सना उत्तम पॅकेजवर ठेवत असतात. वेबसाइट क्षेत्रात आज खूप स्पर्धा आहे. इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर टीव्ही चॅनल्स, वर्तमानपत्रे, नियतकालिके सर्वांनी आपले वेब पाेर्टल तयार केले आहे. वेब पाेर्टल व वेबसाइटने पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नव्या प्रकारचा राेजगार उपलब्ध केला आहे.