प्रेम, भ्नती व करुणा या साेप्या गाेष्टी नाहीत

    16-May-2024
Total Views |
 

health 
 
प्रेम, भक्ती, करुणा ह्या गाेष्टी दुपट्टा ओढण्याइतक्या साेप्या असतात असे बरेच लाेकांचे मत आहे. तुम्हाला काेणत्याही दिव्य शक्तीविषयी अजिबात श्रद्धा नाही तरीसुद्धा, शब्दांचे जाळे पसरून अनेक तास तुम्ही व्याख्यान ठाेकू शकत असाल तर काेणालाही आश्चर्य वाटणार नाही कारण असे करणारे अनेक व्यावसायिक आज समाजात आहेत व ते उजळ माथ्याने फिरत आहेत.नुकतेच एक वाक्य वाचण्यात आले, ‘प्रेम करा’. पण हे इतके साेपे आहे का? तुम्ही आपल्या मुलांना सांगू शकता का की उद्यापासून तू अमुक मुलीवर प्रेम करायला सुरुवात कर. तसेच आणखी एक वाक्य आहे, ‘दया दाखवा’ कुणाला दया दाखवणार? कुणावर करुणा करणार? एका काॅलेजमध्ये एक गमतीशीर तरुण हाेता. ताे फूटपाथवर प्रेमपत्रांची वही विकत घ्यायचा. दुर्दैवाने त्यावेळी झेराॅक्स मशीन नव्हते.ताे प्रेमपत्राच्या वहीतून एडिटिंग करून प्रेमपत्रे लिहायचा. परंतु, त्या बदल्यात त्याला मार मिळायचा.
 
कारण काॅलेजमधील मुली त्याला ओळखत असत. प्रेम, भक्ती किंवा प्रार्थना ही काही अंगमेहनत किंवा कसरत नाही. कितीतरी लाेकांना प्रार्थना कशी करावी, कुणाला करावी, कशासाठी करावी, प्रार्थनेमध्ये मागणी असू नये, या विषयावर लेखमाला किंवा व्याख्यान देता येईल. प्रार्थना तर खूप माेठी गाेष्ट झाली, पण या लाेकांचे चालले तर ते प्रेम कसे करावे, त्याचे टेक्निक व पद्धतीवर काेचिंग क्लासेस चालवतील.इथे गमतीची गाेष्ट अशी आहे, की प्रेम, भक्ती किंवा करूणा या भावना काेणी सांगून येत नाहीत.त्या आतून याव्या लागतात. अनेक श्रीमंत लाेक लग्नसमारंभाच्या प्रवेशद्वारी लिहितात, ‘आओ जी, पधाराे जी, भाेजन करके ही जाना’ पण यात भावनेचा अंश किती असताे? शून्य. त्याऐवजी जर समारंभाचा यजमान स्वत: उभा राहून हात जाेडून सर्वांचे स्वागत करील व जेवणाचा आग्रह करील, तर त्यात त्या माणसाचे प्रेम व भावना दिसून येतात. प्रेम, दया, करूणा या केवळ बाेलायच्या गाेष्टी नाहीत. ते तुमच्या स्वभावाचे एक एक पैलू असतात. त्याने तुमचे व्य्नितत्व सर्वांगाने भरून जाते.