मुलांनाही ध्यानधारणा शिकवा

    15-May-2024
Total Views |
 
 

thoughts 
मुलांना ध्यानधारणेचे तंत्र समजून घेऊन त्याचा वापर केल्यास मुलांच्या चित्तवृत्ती स्थिर हाेण्यास आणि त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत हाेते. त्यातून अभ्यास लक्षात ठेवणे सहजसाेपे बनते.शांतपणे, एकाग्रचित्ताने ध्यान करणारा साधू आणि लहान मूल यांची तुलना हाेऊ शकत नाही; पण आता अनेक पालक आपल्या मुलांना ध्यानधारणेचे महश्रवश्रवल सांगू लागले आहेत. याेग आणि ध्यानधारणेची कला मुलांना शिकवू लागले आहेत.आठवड्यातून दाेन वेळा तीस मिनिटे याप्रमाणे आठ आठवडे दुसरी व तिसरीतील ज्या मुलांनी ध्यानधारणेचा सराव केला त्यांच्या वर्तनात सुधारणा झाल्याचे आणि चाचणी पक्षीक्षेत त्यांची कामगिरी सुधारल्याचे दिसून आले.
 
अमेरिकेतील कॅलनिाेर्निया विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रयाेगात ही बाब पुढे आली आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांच्या एकाग्रतेत आणि वर्गात लक्षपूर्वक ऐकण्याच्या क्षमतेत वाढ झाल्याचेही दिसून आले.सॅन्रान्सिस्काे युनिाईड स्कूलने ध्यानधारणेच्या उपक्रमात 3000 मुलांना सहभागी करून घेतले हाेते. चाचणी परीक्षेत गणित विषयात या मुलांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले. चित्तवृत्ती स्थिर करण्यात आणि जागरूक अवस्था निर्माण करण्यात पूरक ठरणाऱ्या अनुभवातीत ध्यानधारणा या प्रकाराचा ज्यांनी सराव केला, त्यांच्या सर्वसाधारण शालेय प्रगतीत चांगली सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचबराेबर मुलांना शाळेतून काढून टाकणे, निलंबित करणे, त्यांनी शाळा साेडून देणे अशा प्रकारांमध्येही घट झाली.
 
ध्यानधारणेच्या अन्य पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांमध्येही सकारात्मक बाबी ठळकपणे दिसून आल्या.त्यामध्ये भावना नियंत्रित करण्याचे तंत्र काही मुलांना समजले. ताणतणावाच्या घटनांना सामाेरे जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित झाली. सध्या पाचपैकी एक मूल त्यांच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांमुळे काळजी करत असते, तणावाखाली असते. त्यातील 30 ट्नकेमुलांना रात्री झाेप येत नाही.त्याचा त्यांच्या शाळेतील वर्तनावर परिणाम हाेताे. त्या दृष्टीने ध्यानधारणेचा त्यांना उपयाेग हाेऊ शकताे. कारण सर्वे क्षणात असे आढळले की आपले मूल तणावाखाली आहे, याची कल्पना फक्त आठ ट्नकेपालकांना हाेती.