विराट द चीकू

    15-May-2024
Total Views |
 

Virat 
 
विराट काेहली कधी कुठे बाहेर गेला, त्याला फॅन्स भेटले तर सगळ्यांना त्याच्याबराेबर फाेटाे काढून घ्यायचा असताे आणि लाेक त्याला म्हणतात, चीकू, एक फाेटाे काढून घे ना आमच्याबराेबर.विराटच्या मनात येतं की तू काय माझा शेजारी आहेस का मला चीकू म्हणायला? पण ताे बिचारा काढून घेताे फाेटाे. ही सगळी स्टम्प माइकची करामत.मैदानात काय बाेललं जातंय, ते या माइकमधून ऐकू जातं टीव्हीवर. त्यात धाेनी वगैरे मंडळी विराटला ए चीकू, तू उधर जा, असं बाेलताना प्रेक्षकांनी ऐकलेलं असतं.त्यांना कळतं की हे याचं लाडाचं नाव आहे.
 
पण हे नाव पडलं कसं? विराट अगदी किशाेरवयात हाेता, तेव्हा चांगलाच गाेबरा हाेता. त्याचे केस गळायला लागले.काेणीतरी त्याला उपाय सुचवला की ते बारीक काप आणि तेल लावायला सुरुवात कर. ताे एकदा प्रॅक्टिसच्या आधीच केस कापायला गेला आणि त्याने छान मशीन मारून सफाचट करून टाकला सगळा केशसंभार.त्याचे कान माेठे, गाल गाेबरे, ते पाहून टीममधल्या काेणीतरी म्हटलं की हा चंपक काॅमिक्समधल्या चीकू द रॅबिट या सशासारखा दिसताेय. तिथून त्याचं नाव चीकू पडलं ते पडलंच. आता ताे तसा दिसत नाही, तरीही नाव तेच.