दुसऱ्याच्या सिगरेटचा धूरसुद्धा किडनीसाठी त्रासदायक

    15-May-2024
Total Views |
 
 

health 
 
घर, ऑफिस किंवा कुठे बाहेर जर काेणी सिगरेट ओढत असेल आणि त्याचा धूर तुमच्यापर्यंत येत असेल तर सावध व्हा. तुमच्या श्वासातून शरीरात गेलेला हा धूर किडनी स्टाेन हाेण्याचे कारण ठरू शकताे.डाॅ्नटरांचे म्हणणे आहे की, जे लाेक स्वत: धूम्रपान करत नाहीत, पण जास्त काळपर्यंत दुसऱ्यांनी ओढलेल्या बिडी-सिगरेटच्या धुराच्या संपर्कात येतात, त्यांनाही किडनीचा आजार हाेऊ शकताे. सफदरजंग हाॅस्पिटलचे किडनी राेग विभागाचे प्रमुख डाॅ्नटर हिमांशू वर्मा यांनी सांगितले, की सिगरेट, बिडी किंवा सिगार यांचा धूर विषारी असताे. दुसरे लाेक याच्या संपर्कात आले, तर त्यात असलेले हानिकारक घटक र्नतदाब वाढवतात.
 
तसेच हृदयराेग आणि मग किडनीच्या आजाराचा धाेका वाढताे. धर्मशीला नारायणा हाॅस्पिटलचे किडनी राेग विभागाचे वरिष्ठ डाॅ्नटर एल. के. झा यांनी सांगितले, की पॅसिव्ह स्माेकिंग म्हणजे दुसऱ्यांच्या धुराच्या संपर्कात आल्याने शरीरात किडनी स्टाेन हाेऊ शकताे. अशा लाेकांमध्ये किडनी स्टाेनचा धाेका सामान्य लाेकांच्या तुलनेत दुप्पट जास्त असताे. पॅसिव्ह स्माेकिंगच्या तावडीत आलेल्या व्य्नतींच्या र्नतात धूम्रपानामुळे जड घटक तसेच कॅडमियमसारखे सूक्ष्म घटक जमा हाेऊ लागतात. हळूहळू सीरम कॅडमियम वाढत जाते. सिगरेटच्या धुरामुळे प्लाज्मामध्ये आर्जिनिन वॅसाेप्रेसिनची लेव्हलही वाढते. या कारणामुळे मूत्राचा प्रवाह कमी हाेताे. अशा वेळी खराब घटक जमा हाेऊ लागतात आणि नंतर ते स्टाेनमध्ये बदलले जाऊ लागतात.