मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची मदत

    15-May-2024
Total Views |
 
 

CM 
 
घाटकाेपरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेले हाेर्डिंग काेसळून माेठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, 59 जण जखमी झाले आहेत; तसेच अद्यापही 100 जण हाेर्डिंगखाली दबले गेल्याची भीती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला; तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.ही दुर्घटना दुर्दैवी असून, या घटनेची चाैकशी करून दाेषींवर कारवाई केली जाईल. मुंबईतील अनधिकृत आणि धाेकादायक हाेर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अशी हाेर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश महापालिका आयु्नतांनादिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
दुर्घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, हायड्रा आणि क्रेनच्या मदतीने हे हाेर्डिंग हटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू हाेते. आतापर्यंत 57 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.शासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत दिली जाईल.जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील. या घटनेतील दाेषींवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.