पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली कल्याण पूर्व मतदारसंघात जागृती

    13-May-2024
Total Views |
 
 
 

voting 
येत्या 20 मे राेजी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा ह्नक बजावावा, मतदान करून आपली लाेकशाही बळकट करा, असा संदेश देत विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जनजागृती केली. कल्याण लाेकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गाेपीनाथ ठाेंबरे आणि अतिर्नित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. स्वाती घाेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नाेडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली गणेश विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. या भागात विविध ठिकाणी मतदानविषयक माहितीपत्रके वाटप करून 20 मे राेजी मतदान करण्याबाबत आवाहनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर घाेषणा देऊन नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याबाबत संदेश दिले.