अधूनमधून उपवास करणे आराेग्यासाठी चांगले नाही

    13-May-2024
Total Views |
 
 

thoughts 
 
तान्ह्या बाळांना झाेपविताना पुरेशी खबरदारी न घेतल्यास, त्यांचा अचानक मृत्यू हाेऊ शकत असल्याचे ‘पेडिअ‍ॅट्र्निस’ या नियतकालिकातील एका लेखात नमूद करण्यात आले आहे. ‘सडन अनए्नस्पे्नटेड इन्फंट डेथ्स’ (Sudden Unexpected Infant Deaths-SUIDs) असा याचा उल्लेख करतात आणि खबरदारीअभावी असे तीन चतुर्थांश मृत्यू हाेत असल्याचे त्यात म्हटले आहे. अमेरिकेत हे संशाेधन झाले.7,595 तान्ही बाळे अथवा अर्भकांच्या मृत्यूंचा या संदर्भात अभ्यास केला गेला, तेव्हा तीन चतुर्थांश (60 टक्के) प्रकरणांत हे कारण असल्याचे दिसले. पालक आपल्या बाळांना साेबत घेऊन झाेपतात आणि जाेडीदारांपैकी एक जण कुशीवर वळून बाळाच्या अंगावर जात असल्याने गुदमरून बाळाचा मृत्यू हाेऊ शकताे. बाळांना सहसा पलंग, काेच अथवा आरामदायी खुर्चीत झाेपविले जाते. मात्र, त्या मुळे जाेखीम असते.
 
त्या ऐवजी त्यांना पाळण्यात झाेपविणे सुरक्षित असल्याचे या लेखात म्हटले आहे. तान्ह्या बाळांना झाेपविताना पुरेपूर खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यांना एकट्यानेच झाेपविणे चांगले असेही लेखात म्हटले आहे.अधूनमधून उपवास करणे चांगले नाही वजन कमी करण्यासाठी अथवा अन्य कारणांनी अधूनमधून उपवास करण्याच प्रमाण सध्या वाढले आहेत. मात्र, त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार हाेण्याची श्नयता दुप्पट हाेत असल्याचा इशारा चिनी संशाेधकांनी दिला आहे. अमेरिकन हार्ट असाेसिएशनच्या एपिडिमाॅलाॅजी प्रिव्हेन्शन, लाइफस्टाइल अँड कार्डिओमेटाबाॅलिक आराेग्य या विषयावरील कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. अशा उपवासांमुळे संबंधित व्यक्तीच्या आराेग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम हाेतात आणि ती हृदयविकार अथवा पक्षाघातासारख्या विकारांमुळे मृत्यू पावण्याची श्नयता असल्याचे या संशाेधकांनी म्हटले आहे.
 
ठरावीक वेळीच खाणे म्हणजे ‘इंटरमिंटेंट फास्टिंग.’ विशिष्ट तासांच्या अंतराने खाण्याचा यात अंतर्भाव हाेताे.खाण्याचे 16:8 असे वेळापत्रक सध्या लाेकप्रिय आहे.म्हणजे, आठ तासांत खाऊन घेणे आणि 16 तास उपाशी राहणे. यामुळे वजन कमी हाेणे, रक्तदाब, रक्तशर्करा आणि काेलेस्ट्राॅल नियंत्रणात राहणे असे काही अल्पकालीन फायदे हाेत असल्याचे पूर्वीच्या काही संशाेधनांतून आढळले आहे.मात्र, आठ तासांत खाण्याचे दीर्घकालीन परिणाम काय हाेतात याची पाहणी चिनी संशाेधकांनी केली. सरासरी 49 वर्षे वय असलेल्या 20,078 अमेरिकनांचा डेटा त्यासाठी अभ्यासण्यात आला. आठ वर्षे हे संशाेधन चालले हाेते. आठ तासांत खाणाऱ्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या विकारामुळे मृत्यू येण्याची जाेखीम 91 टक्के असल्याचे त्यात दिसले.
 
12- 16 तासांच्या कालावधीत खाणाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण आहे. दहा तासांच्या अंतराने खाणाऱ्यांमध्ये हा धाेका 66 टक्के आहे. ठरावीक वेळीच खाण्यामुळे काेणत्याही कारणाने मृत्यू न येण्याची जाेखीम कमी हाेत नाही. त्या मुळे हृदयविकार असलेल्यांनी या पद्धतीचा वापर विचारपूर्वक करावा, असा सल्ला चिनी संशाेधकांनी दिला आहे.राग येण्यावर लेखन हा उपाय अनेक लाेक फार रागीट असतात आणि त्यामुळे त्यांचेच नुकसान हाेते. पण, एक साधी जपानी पद्धत वापरून तुम्हाला राग नियंत्रणात आणता येताे. राग आल्यावर आपल्या मनातील भावना एका कागदावर लिहा आणि नंतर ताे कागद फेकून द्या.‘या उपायामुळे रागावर काही प्रमाणात तरी नियंत्रण मिळविता येईल असे आम्हाला वाटत हाेते, पण या पद्धतीमुळे ताे पूर्णपणे जाताे,’ असे एका संशाेधकाने सांगितले.
 
‘सायंटिफिक रिपाेर्ट्स’मध्ये याची माहिती देण्यात आली आहे. जपानमधील नागाेया विद्यापीठातील 50 विद्यार्थ्यांवर प्रयाेग करून हा निष्कर्ष काढण्यात आला. ‘सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला परवानगी द्यावी का,’ यासह काही महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांबाबतचे विचार लिहिण्यास या विद्यार्थ्यांना सांगितले गेले.विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांवरून त्यांच्या मनातील राग व अन्य भावनांचे विश्लेषण केले गेले. आपल्या मनातील नकारात्मक भावनाही लिहिण्यास सांगितले गेले हाेते. सहभागींचे दाेन गट करून एका गटाला उत्तरांचा कागद कचरापेटीत टाकण्यास सांगितले गेले, अथवा ताे कागद फायलीत ठेवण्याची सूचना दिली गेली. दुसऱ्या गटाला एका प्लॅस्टिक बाॅ्नसमध्ये कागद ठेवण्यास सांगितले गेले.