जहांगीर कलादालनात मल्लिकार्जुन सिंदगी यांचे ‌‘होरायझन' प्रदर्शन

    13-May-2024
Total Views |

1 
 
मुंबई, 12 मे (आ.प्र.):
 
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महासंघाचे अध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ चित्रकार मल्लिकार्जुन सिंदगी यांचे ‌‘होरायझन' हे चित्रप्रदर्शन 14 ते 20 मे दरम्यान जहांगीर कलादालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती पाहतानाच त्यांच्या कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चित्रकार मल्लिकार्जुन सिंदगी हे चारकोल/कोळशासारख्या पारंपरिक माध्यमापासून ते विविधरंगी पेन, रंगीत पेन्सिल्स, रंगखडू, क्रॅलिक, तैलमाध्यम अशा अनेक प्रकारच्या आधुनिक माध्यमाचा वापर खुबीने करतात.
 
2
 
मुख्यत्वेकरून प्रदर्शनामध्ये कॅनव्हॉस व ॲक्रॅलिक व तैल माध्यमातील काही निवडक कलाकृती प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी (काला घोडा, मुंबई) येथे 14 मे ते 20 मे 2024 या कालावधीत होत असलेल्या या एकल चित्रप्रदर्शनास कलाप्रेमी आणि कला संग्राहकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कलाशिक्षक मुख्याध्यापकपदी निवड होणारे चित्रकार मल्लिकार्जुन सिंदगी हे मोजक्या कलाशिक्षकांपैकी ओळखले जातात. राज्य शासनाने त्यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने गौरविलेले आहे. त्यांचे कलाविषयक लेखन हे पुस्तकांच्या रूपाने अनेकांच्या संग्रही आहे.