तणावरहित दिनचर्येसाठी आजमावून बघा या टिप्स...

    13-May-2024
Total Views |
 
 

health 
 
1. यादी तयार करा. रात्रीच विचारपूर्वक दुसऱ्या दिवशीची रूपरेषा तयार करा. या यादीमध्ये तेवढ्याच कामांचा समावेश असावा, जी तुम्ही सहज करू शकाल.
 
2. प्रत्येक कामासाठी अपेक्षित वेळेपेक्षाही अधिक वेळ राखून ठेवा. यामुळे तुम्ही अनावश्यक तणावापासून स्वतःचा बचाव करू शकाल. वेळेवर काम पूर्ण करण्याने तुम्हाला ते आत्मिक समाधान मिळेल त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व आनंदी भासेल.
 
3. एका वेळेस एकच काम करा. एक काम संपल्यानंतर दुसऱ्या कामास सुरूवात करा. यामुळे तुम्हाला काम पूर्ण झाल्याचे समाधान तर मिळेलच शिवाय तुम्ही पुढील काम हाती घेण्यास माेकळ्या व्हाल.तणावाचे मुख्य कारण कामाचे आधिक्य हे नसून एकाच वेळेस अनेक कार्य करण्याची प्रवृत्ती आहे.
 
4. काेणतंही माेठं आणि कंटाळवाणं काम छाेट्याछाेट्या साेप्या कार्यात विभाजित करा. यामुळे काम करणे साेपेही हाेईल आणि ते करण्यात तुम्हाला रस राहिल. याचा सगळ्यात माेठा ायदा असा की, तुम्हाला थाेडासा वेळ मिळाल्यानंतर तुम्ही कामाचा काही काही अंश सहज पूर्ण करू शकाल.
 
5. लवकर ऊठा. यामुळे तुम्ही तुमचं काम आरामात पूर्ण करू शकाल. उशिरा उठण्याने सकाळी तुमची धावपळ हाेऊ शकते. ज्यामुळे हृदयावर ताण येताे.दुसरं वेळेआधी 15-20 मिनिटं आधी उठलात तर या वेळेचा उपयाेग तुम्ही व्यायाम करण्यासाठी करू शकता. व्यायाम करण्याने तुम्ही दीर्घकाळ खुर्चीवर बसणे, रांगेत खूप वेळ उभे रहाणे यांसारखी कार्यं करण्यास समर्थ हाेऊ शकाल. व्यायामामुळे सर्व अवयवांना पुष्टता मिळते असे नव्हे तर यामुळे आपली कार्यक्षमता वाढण्यासही मदत हाेते.
 
6. दाेन कामांमध्ये आराम करा. एक काम संपल्यानंतर जर तुम्ही थकला असाल तर थाेडावेळ थांबा.अर्धा तास एखादं आवडतं पुस्तक, मासिक अवश्य वाचा. किंवा आवडीचं संगीत ऐका. हा थाेडासा आराम तुमच्यासाठी स्ुर्तीदायक ठरेल.
 
7. स्वतःला सक्षम स्री सिद्ध करण्याच्या ंदात अडकू नका. तुम्ही काेणी सुपर वुमन नाही. घरी आणि ऑिफसमध्ये स्वतःला सर्वाेत्तम सिद्ध करण्याच्या नादात तुम्ही थकवा आणि तणावाला आमंत्रण देत आहात, हे लक्षात घ्या. कुटुंबातील इतर सदस्यांची मदत अवश्य घ्या. मदत मागणे आणि मदत करणे यामुळे संबंध दृढ हाेण्यास मदत हाेते, हे लक्षात घ्या.
 
8. स्वतःवर अजिबात अन्याय करू नका. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. पाैष्टिक आहार, थाेडा व्यायाम आणि पुरेशी झाेप तुमची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
 
9. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जीवनात प्रत्येक गाेष्ट सहजपणे आणि साेपी करून स्वीकारा.भय, उदासीनता, ईर्ष्या, घृणा, निराशा, अपराध इत्यादी मनाेविकार शारीरिक क्षमता कमी करतात.जीवनास प्रसन्न मनाने सामाेरे जा.
 
10. कामास ओझं समजू नका. प्रत्येक कामात आनंद शाेधा. हा आनंद तुमच्यासाठी टाॅनिकचे काम करेल आणि निश्चितपने तुम्हाला अधिक उत्साही वाटेल. याउलट छाेट्याशा कामासही ओझं मानण्याने त्या ओझ्यापासून मुक्ती मिळविण्याच्या प्रयत्नात तणावास आमंत्रण मिळते. लक्षात ठेवा, प्रत्येकालाच दिवसाचे चाेवीस तास मिळतात. ते आपण कमी करू शकत नाही, तसंच वाढवूही शकत नाही. प्रसन्नता, नियाेजन आणि सम जूतदारपणा या आधारावर तुम्ही तेवढ्या वेळात जास्तीत जास्त काम करू शकता आणि ते सुद्धा थकव्यास आजूबाजूस िफरकू न देता...