मतदारांचा स्वयंप्रेरित उत्साह हे भारतीय निवडणूक आयाेगाचे यश

    11-May-2024
Total Views |
 

voting 
 
भारतासारख्या लाेकशाही देशात निवडणूक प्रक्रिया महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरित मतदानासाठीचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हे आयाेगामार्फत राबवण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमाचे यश असून, मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयाेगाने उत्कृष्ट नियाेजन केल्याचे मत निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.केंद्रीय निवडणूक आयाेगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांबराेबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आयव्हीपी कार्यक्रम आयाेजित केला आहे. त्यात परदेशी शिष्टमंडळ प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी महाराष्ट्रात आले आहे. रायगड जिल्ह्यातील मतदान केंद्रावरील प्रक्रियेची पाहणी केल्यानंतर या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चाेक्कलिंगम यांची भेट घेऊन देशातील निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
या शिष्टमंडळात बांगला देश, श्रीलंका, कझाकिस्तान आणि झिम्बाब्वे या देशातील प्रतिनिधींचा समावेश आहे.शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी यावेळी मतदान केंद्रावरील पाहणीबाबत आपला अनुभव व्यक्त करताना येथील मतदारांची माेठी संख्या लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरील सुव्यवस्था, सुरळीत सरूु असलेली मतदान प्रक्रिया निश्चितच यंत्रणेच्या तयारीचे यश असल्याचे सांगितले. सर्व वयाेगटातील मतदारांचा उत्साह माेठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. विशेषतः मतदारांच्या चेहऱ्यावर मतदानाचा असलेला आनंद हा एखाद्यासणात सहभागी झाल्यासारखा हाेता, असे या प्रतिनिधींनी आवर्जून सांगितले.चाेक्कलिंगम यांनी देशातील निवडणूक प्रकिया पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्याला निवडणूक आयाेगाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत असून, राज्यात आतापर्यंत तीन टप्प्यात झालेली मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित, शांततापूर्ण पद्धतीने यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती चाेक्कलिंगम यांनी दिली.