उपभाेगापेक्षा जास्त उत्पादन करा

    11-May-2024
Total Views |
 
 
thoughts
 
त्यांनी हेही सांगितले की, कशाप्रकारे ते अ‍ॅमेझाॅनला 120 लाख काेटी रुपयांची कंपनी बनवणार आहेत. त्यांनी शेअरधारकांना लिहिलेल्या पत्राचा संपादित भाग देत आहाेत...व्हॅल्यू दिल्याशिवाय काेणताही बिझनेस यशस्वी हाेत नाही. आमच्यासाठी ग्राहक आणि त्याच्या समाधानालाच प्राधान्य आहे.जर आपण बिझनेसमध्ये यशस्वी हाेऊ इच्छित असाल, (जीवनात आणि वास्तवातही) तर आपल्या उपभाेगापेक्षा जास्त निर्माण करायला शिकायला हवे. आपले लक्ष्य ज्यांच्यासाेबत आपला राेजचा संबंध आहे, त्या सर्वांसाठी व्हॅल्यू उत्पन्न करणारे असायला हवे. काेणताही बिझनेस जाे व्हॅल्यू निर्माण करू शकत नाही, ताे भलेही यशस्वी हाेताना दिसत असला, तरी दीर्घकाळ टिकू शकत नाही.आमच्यासाठी पहिले प्राधान्य ग्राहक आहे.
 
आम्ही त्यांना कमी किंमत, निवडीसाठी माेठी चेन आणि ास्ट डिलिव्हरी देत असताे; पण आम्ही हेही लक्षात ठेवायला हवे की, त्यांचा वेळ कसा वाचू शकेल.गाेष्ट जेव्हा ग्राहकाची येते, तेव्हा आपल्याला काळाच्या पुढे चालायलाच हवे. अ‍ॅमेझाॅनवर ग्राहक आपली 28 ट्नके खरेदी 3 मिनिटे वा त्यापेक्षा कमी वेळेत पूर्ण करत असताे आणि संपूर्ण खरेदीचा निम्मा भाग 15 मि निटांपेक्षा कमी वेळेत संपून जाताे. याची तुलना आम्ही पारंपरिक स्टाेअरवर खरेदीशी केल्यास ड्रायव्हिंग करीत स्टाेअरपर्यंत जाणे, पार्किंगसाठी जागा मिळवणे, स्टाेअरमध्ये खरेदी केल्यानंतर चेक आऊट लाइनसाठी वाट पाहणे आणि शेवटी कार शाेधून परत घरी येणे. अर्थातच, ग्राहक सर्व त्रासांमध्ये आपला किती वेळ खर्च करताे, याचा विचार करा. 21व्या शतकात वेळ हेच सर्वांत माेठे धन असेल. आम्ही वेळेची बचत ग्राहकासाठी व्हॅल्यूत बदलायला शिकावे.
 
ग्राहक आणि त्याचे समाधान आपले सर्वांत पहिले प्राधान्य आहे.कर्मचाऱ्यांबाबत बाेलायचे, तर माझा आपल्या 13 लाख साथीदारांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांची जिद्द आणि समर्पण यामुळेच आपण जगातील सर्वांत माेठी कंपनी आणि कामासाठी सर्वांत सुरक्षित जागेच्या रूपात ओळखले गेलाे आहाेत. तसे आमच्यावर नेहमी आराेप हाेतात की, आमच्याकडे कामाचे प्रेशर अधिक असते. आमचे कर्मचारी अनेक तास आपल्या सेवा देतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. अँडी जेसी (नवे सीईओ) ही गाेष्ट चांगल्या प्रकारे जाणून आहेत.