प्रेमामुळे 10 वर्षांनी पती आला काेमातून बाहेर!

    11-May-2024
Total Views |
 


health
 
 
प्रेम काहीही करू शकते, कधीही, काेठेही, काेणासाठीही. मनात फक्त प्रेमाची भावना आणि ऊर्मी हवी. चीनमधील अनहुई प्रांतातील रहिवासी असलेल्या सन हाेंग्झिया या महिलेने याची प्रचिती घडवली आहे.सन हाेंग्झिया या महिलेच्या पतीस सन 2014मध्ये हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे ताे काेमात गेला. पती काेमात असला तरी या महिलेचे त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. तिने त्याच्या जगण्याची आशा साेडण्यास नकार दिला. त्याच्या बरे हाेण्यावरचा तिचा अढळ विश्वास शेवटी फळाला आला. अखेर 10 वर्षांनी तिचा पती काेमातून बाहेर आला. प्रेमातील चमत्कार आणि महिलेची समर्पण वृत्ती पाहून तिच्या नावाची समाजात जाेरदार चर्चा आहे. अमर्याद प्रेम यामुळेच तिचा पती काेमातून परत आल्याचे मानले जात आहे. चीनमधील साेशल मीडियावर या महिलेबद्दल माहिती देणारी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.