अविचल रेखा

    11-May-2024
Total Views |
 
 

Rekha 
 
रेखा ही सिनेमात आली तेव्हा जाडी, ढम्माली, बेढब आणि बऱ्यापैकी कुरूप दिसणारी काळ्या वर्णाची ‘मद्रासी’ अभिनेत्री हाेती. फक्त ती उफाड्याच्या देहाची हाेती, फारच तरुण हाेती आणि बिनधास्त बाेल्ड हाेती, म्हणून तिला सिनेमे मिळू लागले.अमिताभ बच्चनच्या सहवासात आल्यावर मात्र रेखामध्ये अंतर्बाह्य बदल झाला आणि ती कुठल्या कुठे निघून गेली. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक प्रयाेगही केले, अनेक आव्हानात्मक भूमिकाही स्वीकारल्या. त्यातली एक हाेती उत्सव सिनेमातल्या वसंतसेनेची. मुळात एका गणिकेची भूमिका आणि तीही अतिशय बाेल्ड, इराॅटिक पद्धतीने सादर हाेणार हाेती.
 
ती करताना साेबत नायक नवखा हाेता, त्याचा पहिलाच सिनेमा हाेता. पण, तिने हे आव्हान स्वीकारलं. शूटिंगचा पहिला दिवस. इकडे रेखा तयार हाेते आहे आणि तिकडे बातमी आली की रेखाच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. नायक शेखर सुमन घाबरला. आता ही शूटिंग साेडून निघून जाणार, नंतर सिनेमा साेडणार, आपल्या करिअरची वाट लागणार, ही भीती याला हाेती. मात्र, रेखा ही बातमी ऐकल्यावर शशी कपूरला म्हणाली, बबुवा, चल, शूटिंगची तयारी कर. मी काही सेट साेडून जाणार नाही घरी. माझी इथे कमिटमेंट आहे. त्यांना काय उचकपाचक करायची आहे ती करू देत