व्हर्च्युअल कामात जागतिक संधी

    01-May-2024
Total Views |
 
 
 

health 
काय असू शकतात संधी? रिमाेट वर्किंगमध्ये एंट्री लेव्हलसाठीची पदेही आहेत. तसेच विशेष प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदांसाठीही. काही क्षेत्र अशी आहेत ज्यांच्यात संधी सुलभपणे मिळतात.
 
व्हर्च्युअल असिस्टंट : यामध्ये परंपरागत प्रशासकीय काम जसे ई-मेल मॅनेजमेंट, बिझनेस डा्नयुमेंट तयार करणे, अपाॅइंटमेंट शेड्युलिंग, साेशल मीडिया अपडेट, डेटाएंट्री इत्यादी समाविष्ट असतात.
 
ट्रान्सलेटर्स : रिमाेट ट्रान्सलेटर फाइल्स आणि कागदपत्रांचा अनुवाद, मीटिंग्सच्या चर्चेचा अनुवाद इत्यादी करावे लागते. या क्षेत्रात कमी लाेकप्रिय भाषांच्या जाणकारांना चांगली मागणी आहे.
 
कस्टमर सर्व्हिस : हे रिमाेटवर्कर्स बऱ्याच काळापासून आपल्या जगाचा भाग आहेत.ते ग्राहकांच्या साह्यासाठी निश्चित अधिकार आणि माहिती यासह काम करतात.
 
डेटाएंट्री आणि ट्रान्सक्रिप्शन : यामध्ये पेराेल डेटा, कॅटलाॅग अशी स्प्रेडशीट किंवा एखाद्या साॅफ्टवेअर प्राेग्रॅममध्ये डेटा भरणे हे असते. तेच डेटा ट्रान्सक्रिप्शनमध्ये एखाद्या व्यावसायिक मीटिंगच्या ऑडिओ किंवा व्हिडिओ फाइलला कागदपत्रांमध्ये नाेंदविण्यात येते.
 
प्राेजे्नट मॅनेजमेंट : सर्वसाधारपणे त्यासाठी मॅनेजमेंट किंवा संबंधित क्षेत्रात अंडरग्रज्युएट डिग्रीची मागणी केली जाते.
मास्टर्स डिग्रीना संधी अधिक चांगल्या येतात. काैशल्य वाढविण्यासाठी प्राेजे्नट मॅनेजमेंटचे अनेक प्राेफेशनल सर्टिफिकेशन प्राेग्रॅम्स करू शकता.
 
तंत्रज्ञान संधींना वाढवेल ः 5-जी तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित साॅफ्टवेअर्स, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आल्याने जगभरात कुठेही कने्निटव्हिटीची समस्या येणार नाही. त्यामुळे कार्यश्नतीचा जागतिक स्तरावर जास्त विस्तार हाेईल. जगातील काेणत्याही काेपऱ्यातून रिमाेट लाेकेशनने (दूर अंतरावरून) काम करणे साेपे हाेईल.
 
इंडस्ट्री आणि प्रमुख ऑनलाइन प्लॅटफाॅर्म : रिमाेटजाॅबचा प्लॅटफाॅर्म फ्ले्नस जाॅब्सच्या सन 2022 च्या लिस्टनुसार सर्वांत जास्त रिमाेटवर्क ऑफर करणाऱ्या इंडस्ट्रींमध्ये काॅम्प्युटर, माहिती-तंत्रज्ञान, शिक्षण, मार्केटिंग, अकाउंटिंग आणि फायनान्स सहभागी आहे. ल्निंडइनच्या रिपाेर्टनुसार सध्या हायब्रिड वर्कचे वर्चस्व असूनही रिमाेर्ट वर्किंगची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त हाेईल.