उन्हाळ्यात आराेग्य थंड राखण्याचे फंडे

    07-Apr-2024
Total Views |
 
 

health 
 
निसर्गाच्या सान्निध्यात राहा : नदी, तलाव, झऱ्यांजवळ जा. डाेंगर-दऱ्या, निसर्गाच्या सुरम्य ठिकाणी, बागांचा आनंद घ्या. काहीच नसेल, तर किमान सकाळसंध्याकाळ घराच्या बागेची देखभाल करा.राेपांना पाणी द्या. शुद्ध माेकळ्या हवेत श्वास घ्या. ध्यान व प्राणायाम करा.
 
ताजे सुपाच्य जेवण : हलके, ताजे, व लवकर पचणारे जेवण करा. भुकेपेक्षा कमी खा आणि पाणी जास्त प्या. कलिंगड, आंबा, संत्री, द्राक्षे, खरबुजासारखी रसाळ फळे खाल्ल्यास पाेटही भरेल व शरीराची पाण्याची गरजही भागेल.
 
हलकेफुलके कपडे : फेंट रंग डाेळ्यांना गारवा देताे. यासाठी उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी आपण फेंट रंगाच्या कपड्यांचा वापर करावा.सुती कपडे घाम शाेषून गारवा देतात.यासाठी या माेसमात काॅटन, शिफाॅन, जाॅर्जेट, क्रेप सारख्या पातळ व हल्नया कपड्यांचा वापर करावा, ज्यात हवा सहजतेने खेळू शकते.एकदा वापरलेले कपडे धुऊनच पुन्हा वापरावेत.
 
पेयपदार्थ जास्त प्या : पेयपदार्थ उन्हाळ्याचा काेप शांत करण्यासाठी उपयुक्त असतात. यासाठी उन्हाळ्यात घनआहाराऐवजी द्रव पेय पदार्थ म्हणजेच माठातील थंड पाणी, लिंबू पाणी, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, फळांचा रस, ताक, लस्सी जास्त प्रमाणात घ्या. यामुळे शरीरात तरतरी राहील व एनर्जी लेव्हलही मेंटेन राहील.
 
व्यायामाकडे लक्ष द्या : उन्हाळ्यात व उकाड्यात थाेडेसे वर्क आउटही शरीराला थकवते. पण याचा अर्थ ए्नसरसाइज साेडावा असा नाही. पण जास्त प्रमाणात व जास्त घाम येणाऱ्या व्यायामाऐवजी हलकाफुलका साेपा व्यायाम करावा.ध्यान, याेग, प्राणायाम करावा. हवे तर सकाळ-संध्याकाळ फिरूनही व्यायामाची पूर्तता करू शकता.
 
आरामही हवा : हिवाळ्यात गाढ व दीर्घझाेपेची पूर्तता रात्रीच हाेते. पण, उन्हाळ्यात झाेप पुरेशी व गाढ लागत नाही. यामुळे थकवा राहताे जाे अनावश्यक चिडचिड निर्माण करताे. यासाठी जेव्हा आरामाची गरज असेल तेव्हा आराम करावा.
 
अति शारीरिक श्रम टाळा : उन्हाळ्यात खूप जास्त शारीरिक श्रमाने घामाच्या रूपात पाणी व मिनरल्स जास्त प्रमाणात उत्सर्जित हाेतात. यामुळे शरीरात पाणी आणि खनिज क्षार कमी हाेतात. अशा स्थितीत पचनक्रियेवरही परिणाम हाेताे. शरीर कूल राखण्यासाठी आपली शारीरिक क्षमता लक्षात ठेवा व अतिश्रम टाळा.
 
उन्हापासून रक्षण : उन्हात राहिल्यामुळे शरीराचे तापमान गरजेपेक्षा जास्त वाढते.शरीरातील पाणीही वेगाने कमी हाेते. यासाठी सकाळी दहा ते सायंकाळ चार दरम्यान उन्हात जाणे टाळावे. खूप जास्तच गरज असेल, तर शरीर पूर्णपणे झाकून कच्चा कांदा साेबत ठेवूनच बाहेर पडावे. कॅप, सनग्लासेस व सनस्क्रीनचा वापर अवश्य करावा.
 
थंड प्रकृतीच्या वस्तूंचा वापर : नैसर्गिक संतुलनासाठी सर्व ऋतू अनिवार्य आहाेत, पण उन्हाळ्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी थंड प्रकृतीचे खाद्यपदार्थ आपल्या खाण्यात सामील करावेत.नियमितपणे बेलाचे सरबत, कैरीचे पन्हे, आवळा आणि इतर थंड पदार्थांचा वापर करावा. कच्चा कांदा जेवणात सामील करावा. खाद्यपदार्थ गरम-थंडच्या आधारे नव्हे, तर त्याच्या प्रकृतीच्या आधारे ओळखावेत. उदा. आइसक्रीम, काेल्डड्रिंक व बर्फाचा गाेळा थंड असूनही शरीराची उष्णता वाढवतात.