केवळ एका पायाने माऊंट रानाेक सर

    07-Apr-2024
Total Views |
 
 

Mount 
 
काेलकात्याच्या उदयकुमारने स्निकीमचा 16 हजार 500 फूट उंच माऊंट रानाेक एका पायाने सर केला आहे. त्याला 91 ट्नकेअपंगत्व आहे; पण हिमालयाएवढे उंच शिखर त्याने सर केले आहे. गंगटाेक सरकारने त्याचे फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून या आश्चर्यकारक कामगिरीचे स्वागत केले. 35 वर्षीय उदयकुमार यांना 2015 मध्ये रेल्वे अपघातात डावा पाय आणि उजव्या पायाची चार बाेटे गमवावी लागली. या घटनेच्या गंभीर आघातामुळे त्यांनी आपले आयुष्य संपवण्याचा विचारही केला; परंतु नंतर ताे बदलून जीवनातील प्रत्येक आव्हानाला खंबीर मनाने सामाेरे जाण्याचे त्यांनी ठरवले.उदयकुमार यांचा पुढील प्रवास मॅरेथाॅनने सुरू झाला. भारतभरात सुमारे 55 मॅरेथाॅन पूर्ण केल्यानंतर त्यांनी गिर्याराेहण सुरू केले. हा साहसवीर म्हणताे, ‘मी जिवंत असण्याचे एक़मेव कारण म्हणजे साहसी खेळात भाग घेणे. अशा कामगिरीतून मला तरुणांना प्रेरणा द्यायची आहे. येत्या काही दिवसांत मी एव्हरेस्टवर चढाई करणार आहे.