भारतात कनेक्टेड कार्स घेण्यास ग्राहकांची पसंती

    07-Apr-2024
Total Views |
 
 


Car
 
कने्नटेड कार’ना सध्याच्या ग्राहकांकडून जास्त मागणी असून, चांगले उत्पन्न आणि अशा गाड्यांची नवीन माॅडेल्स येणे हे त्याचे कारण आहे. नव्याने कार खरेदी करू इच्छिणारे अशा गाड्यांना पसंती देतात.कने्नटेड कार’मध्ये अत्याधुनिक तांत्रिक सुविधा असतात. त्यात असलेल्या चिप्समुळे इंटरनेट अ‍ॅ्नसेस मिळताे आणि सेन्सर्समुळे गाडी चालविणे सुरक्षित ठरते.आर्थिक वर्ष 2021मध्ये अशा प्रकारच्या गाड्यांची विक्री 30 टक्के झाली हाेती.सतत कने्निटव्हिटी मिळणे आणि सुरक्षित ड्रायव्हिंगला नवतरुणाईचे प्राधान्य असल्याने या प्रकारच्या गाड्या आता जास्त विकल्या जात आहेत. हे लक्षात घेऊन माेटार निर्माते प्रिमियम एसयूव्हींमध्ये अशी फीचर्स देत आहेत. मिडसाइज एसयूव्हींच्या बाजारपेठेत सध्या अशा गाड्यांचा खप दाेन तृतीआंश असून, त्यात ह्यूंदै क्रेटा, टाेयाेटा अर्बन क्रुझर हायरायडर, मारुती सुझुकी ग्रॅण्ड व्हिटारा आणि किया सेल्टाॅस यांचा समावेश आहे.
 
टक्करविराेधी (अँटी-काेलायन) यंत्रणा, गाडी चालविताना ती लेनमध्येच राहण्यासाठी सहाय्य तसेच जीपीएस प्रणाली आदी सुविधा या गाड्यांमध्ये असतात. अशा सुविधांनी परिपूर्ण असलेल्या गाड्यांचा खप सध्या 45 ट्न्नयांवर गेला आहे. ‘कने्नटेड कार्सच्या मागणीत गेल्या तीन-चार वर्षांत माेठी वाढ झाली आहे. कने्निटव्हिटीचे प्रगत तंत्रज्ञान आणि ्नलाउड आर्किटे्नचरमुळे या गाड्या आधुनिक झाल्या आहेत,’ असे मारुती सुझुकीच्या मार्केटिंग आणि विक्री विभागाचे वरिष्ठ अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले. भारतातील कार खरेदीदार सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे ‘डेलाेट्टी’ने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी चालकांना कंपनीकडून टिप्सची अपेक्षाही असते.
 
कने्निटव्हिटी फीचर्ससाठी जास्त रक्कम माेजण्याची 71 टक्के ग्राहकांची तयारी आहे आणि 88 टक्के चालक त्यांच्या वाहनाच्या सुरक्षेबाबत अलर्ट्सची अपेक्षा करतात. अशा ग्राहकांमुळे ‘कने्नट कार्स’ची मागणी वाढताना दिसते.किया सेल्टाेस एसयूव्हीच्या खपामध्ये कने्निटव्हिटी फीचर्स असलेल्या गाड्यांची विक्री 48 टक्के आहे. वाहन खरेदीच्या पाच निकषांत ग्राहकांचे सर्वाेच्च प्राधान्य सुरक्षिततेला आहे. दुर्घटना टाळण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त सुरक्षाविषयक फीचर्स असलेली वाहने हवी असल्याचे यातून दिसते. ‘भारतातील कार खरेदी करणारा ग्राहकवर्ग तरुण वयाचा असल्याने ताे तंत्रज्ञानकुशल आहे. त्यांना सुरक्षेसह सर्व फीचर्स हवी असतात आणि त्यासाठी जास्त पैसे देण्याची त्यांची तयारी आहे,’ असे ह्यूंदै माेटर इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तरुण गर्ग यांनी सांगितले.ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊन कार निर्मातेही तशी फीचर्स देत आहेत.