वैद्यकीय मदतीशिवाय ‘ओशन बेबी’चा जन्म

    07-Apr-2024
Total Views |
 
 
 


Baby
 
38 वर्षीय जाेसी काॅर्नेलियसला समुद्राची इतकी ओढ लागली की, तिने काेणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय पाेहताना पहाटे दाेन वाजता एका बाळाला जन्म दिला. साेशल मीडियावर तिने पाेस्टदेखील केली आहे, ज्यामध्ये ती नवजात बाळावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.
पाच मुलांची आई असलेल्या जाेसीची ही दुसरी ‘ओशन बेबी’ आहे. 2022 मध्ये पॅसिफिक महासागरात तिने एका मुलीला जन्म दिला आणि तिच्या जन्मानंतर पाचच दिवसांत जाेसीने ठरवले, की पुढील बाळाचा जन्म कॅरिबियन समुद्रात हाेईल.प्रसूती तारखेच्या दाेन महिने आधी ती कॅरिबियन बेटावर पाेहाेचली. या बेटावर माेफत मूल जन्माला घालण्याची याेजना आखण्यात आली हाेती. प्रसूतिवेदना सुरू हाेताच ती समुद्रात गेली आणि रात्री उभी राहून तिने मुलाला जन्म दिला.काही ‘यूजर्स’नी नवजात बाळाबद्दल चिंता व्य्नत केली आहे आणि टिप्पणी केली आहे, की ते बाळ निराेगी नाही.समुद्रात अनेक जीवाणू असतात. बाळ उबदार गर्भातून थेट थंड समुद्रात जन्माला येणे धाेकादायक ठरू शकते.