व्हील चेअरवर बसून अपंग तरुणाचे धाडसी बंजी जंपिंग

    05-Apr-2024
Total Views |
 
 

jump 
 
संध्यानंद.काॅम बंजी जंपिंग हे काेणाचेही काम नाही; मात्र हृषिकेश नावाच्या एका तरुणाने आपल्या साहसाचे फळ मिळेल, या आशेने शेकडाे फुटांवरून उडी मारली आहे. हृषिकेश अ‍ॅडव्हेंचर्स या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये व्हीलचेअरवर बांधलेला तरुण बंजी जंप करताना दिसत आहे. 2.3 काेटी व्ह्यूजसहहा व्हिडिओ प्रचंड हिट झाला आहे.व्हिडिओमध्ये एक तरुण जाे स्वत:च्या पायावरही उभा राहू शकत नाही, ताे व्हीलचेअरवर उभा राहून बंजी जंपिंगला जाताे. त्याचे मित्र आणि साहसी क्रीडातज्ज्ञ त्याला सुरक्षा उपकरणे बांधतात आणि मग ताे तरुण उभा राहताे आणि उडी मारताे.हृषीकेश शेकडाे फुटांवरून हवेत लटकताे आणि मग सुखरूप उतरताे.