मुलांना आयाेडिनचा याेग्य डाेस मिळत आहे ना ?

    05-Apr-2024
Total Views |
 
 
 
health
किती आयाेडिनची गरज असते? वय हा कारक आपल्याला सांगत असताे की, आपल्या शरीराला किती आयाेडिन पुरेसे आहे. आपले शरीर दीर्घकाळपर्यंत आयाेडिन साठवू शकत नाही.त्यामुळेच आपल्याला नियमितपणे छाेट्या प्रमाणात आयाेडिन घेत राहण्याची गरज असते. 1 ते 8 वर्षांपर्यंत आपल्याला राेज 90 मायक्राे ग्रॅम, 9 ते 13 वर्षांपर्यंत 120 मायक्राे ग्रॅम व 14 पेक्षा जास्त वयात राेज 150 मायक्राे ग्रॅमची गरज असते. तेच गर्भवतींना 220 मायक्राे ग्रॅम व स्तनपान करवणाऱ्या महिलांना राेज 290 मायक्राे ग्रॅम आयाेडिनची गरज असते.आयाेडिन कमी हाेण्याचा परिणाम...
 
आयाेडिन मुलांच्या याेग्य विकासासाठी अत्यावश्यक असते. थायराॅइड हार्माेन व्यवस्थित काम करण्यासाठी आयाेडिन जास्त आवश्यक असते.आयाेडिन पुरेशा प्रमाणात घेणे काेणत्याही वयाच्या मुलांच्या मेंदूच्या याेग्य विकासासाठी खूप गरजेचे असते. थायराॅइड हार्माेन मेटाबाॅलिज्म व शरीरातील इतर महत्त्वाची कामे नियंत्रित ठेवते.आयाेडिनची पातळी कमी झाल्यास लाे थाॅयराइड फं्नशनची समस्या निर्माण हाेत नाही, तर आयाेडिनअभावी थाॅयराइड ग्रंथीत असामान्य वाढ हाेऊ शकते ज्याला ‘गाेइटर’ म्हणतात. मुलांमध्ये यामुळे मानसिक समस्याही वाढू शकतात. आपले शरीर नैसर्गिकपणे आयाेडिन उत्पन्न करू शकत नाही. त्यामुळे ते मिळवण्याची एकमेव पद्धत आहे आपला आहार.
 
आयाेडिनच्या अभावाची लक्षणे ः नवजात शिशूंना आयाेडिनअभावी श्वास घेण्यास त्रास, जीभ वाढणे, चेहऱ्यावर सूज, स्नायूंमध्ये समस्या व अत्याधिक झाेप येण्याची समस्या हाेऊ शकते.वाढत्या वयातील मुलांना या पाेषक तत्त्वाअभावी विकासासंबंधित समस्या, उशिरा दात येणे, तारुण्यावस्थेला उशीर हाेणे व कमकुवत मानसिक विकासाच्या समस्या हाेऊ शकतात.
 
यातून मिळेल आयाेडिनआयाेडिनच्या अभावाचा उपचार सकस आहारातून करता येऊ शकताे. आहारात पुरेसे आयाेडिन नसल्यास आपण आयाेडिन सप्लीमेंटचे सेवन करण्याची गरज असते. आयाेडिनचे मुख्य स्राेत सीफूड, अंडी, डेअरी उत्पादने; याशिवाय आयाेडाइज्ड टेबल साॅल्ट आहेत.याशिवाय दूध, पनीर इ. डेअरी उत्पादने, अंड्याची जर्दी, समुद्री मासे, काेळंबी, केळी-स्ट्राॅबेरीसारखी फळे, कांदे, रताळी, शेंगदाणे व जव इ. आयाेडिनचे उत्तम स्राेत आहेत. ते नियमितपणे आहारात देऊन आपण आयाेडिनच्या अभावापासून मुलांना वाचवू शकता