विरोधी पक्षांकडून घटना बदलण्याचा खोटा प्रचार : रामदास आठवले

विकासासाठी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आठवलेंचे आवाहन

    27-Apr-2024
Total Views |

co 
 
खळद, 26 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
लोकशाही संकटात असल्याचे सांगून घटना बदलण्याचा खोटा प्रचार विरोधी पक्षांकडून करून गैरसमज निर्माण केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलली जाणार नाही. कोणी ती बदलणार असेल, तर आम्ही त्यांना फाडून टाकू. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासपुरुष आहेत. विकासाच्या दिशेने दृत्यांची वाटचाल चालू आहे. ते कधीही घटना बदलणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या महायुतीसोबत आहोत. विकासाच्या मार्गाने चालण्यासाठी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. पुरंदर तालुक्यातील खळदमधील माउली गार्डन मंगल कार्यालयात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आठवले बोलत होते.
 
यावेळी एनसीपीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार अशोक टेकवडे, संभाजी कुंजीर, पश्चिम महाराष्ट्र भाजप अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, बाबा जाधवराव, दिलीप यादव, बाळासाहेब कामठे, शरद जगताप, दत्तात्रेय झुरंगे, विक्रम शेलार, विराज काकडे, सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, पंकज धिवार, स्वप्निल कांबळे, उत्तम धुमाळ, विष्णुदादा भोसले, नीलेश जगताप, परवीन पानसरे, वंदना जगताप, शांताराम कापरे आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले, ‌‘पूर्वीच्या सरकारचे कामकाज भ्रष्ट होते. मोदी सरकारच्या कार्यकाळात सामान्य जनतेसाठी मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत योजना अशा विविध योजना अमलात आल्या. त्यातून करोडो लोकांचा फायदा झाला आहे.' रस्ते आणि रेल्वेबाबत झालेल्या प्रगतीविषयी सांगत त्यांनी त्यांच्या विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी सर्वांकडून 2024 मध्ये एनडीएला म्हणजेच सुनेत्रा पवारांना मतदान करण्यासाठी घरोघर जाण्याचे आवाहन केले. पुरंदर तालुका आरपीआयचे अध्यक्ष पंकज धिवार यांनी केले. प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन शरद जगताप यांनी केले. स्वप्निल कांबळे यांनी आभार मानले.
 
शरद पवार महायुतीत यायला हवे होते
रामदास आठवले पुढे म्हणाले, शरद पवारांनी महायुतीत यायला हवे होते. ते विकासाच्या दिशेने जाणारे नेते आहेत. काँग्रेस पक्षातून त्यांना हटवल्यानंतर त्यांनी एनसीपीच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेससोबत न जाता नरेंद्र मोदींना म्हणजेच विकास आणि देशाच्या प्रगतीला साथ द्यायला हवी होती.