‌‘जुनं फर्निचर...' या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा

    27-Apr-2024
Total Views |

fur 
 
पुणे, 26 एप्रिल (आ.प्र.) :
 
घरातल्या ज्येष्ठांना अनेकदा जुने फर्निचर असे संबोधले जाते. नव्या घरात जुने फर्निचर जसे आऊटडेटेड होते, मिसमॅच होते तशीच काहीशी अवस्था या ज्येष्ठांची झालेली असते. दोन पिढ्यांमधील या दुराव्याच्या वास्तवाचे चित्रण असलेला 26 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, 27 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता सिटी प्राईड, कोथरूड येथे विशेष शा चे आयोजन केले आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक व मुख्य अभिनेते महेश मांजरेकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेवेळी लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनचे संचालक सत्यप्रभा गिरी व मेधा मांजरेकर उपस्थित होत्या. सत्य-सई फिल्म्स आणि स्कायलिंग एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‌‘जुन फर्निचर'चे यतिन जाधव निर्माते आहेत.
 
कथा-पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, भूषण प्रधान यांच्या भूमिका आहेत. लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनचे संचालक सत्यप्रभा गिरी म्हणाले, आम्ही पुनर्विकासामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न केंद्रित ठेवूनच काम करतो. हे करताना घराबरोबरच ज्येष्ठाची मानसिकता बदलणे म्हणजेच रिडेव्हल्पमेंट होईल. ‌‘जुनं फर्निचर' या चित्रपटातील 71 वर्षांचा गोविंद श्रीधर पाठक हा म्हातारा व्यवस्थेला आव्हान देताना म्हणतो की, या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा...आपल्या पत्नीच्या निधनाचा ठपका आपल्या मुलांवर ठेवत कोर्टामध्ये नुकसान भरपाईचा दावा करतो. या चित्रपटाचा विषय केवळ कुटुंबिक नाही, तर अंतरंगातही डोकावण्याची संधी आहे.