पीडीसीसी बँकेची 25 हजार कोटीव्यावसायिक उलाढालीकडे वाटचाल

    26-Apr-2024
Total Views |

p 
 
पुणे, 25 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पीडीसीसी बँक देशातील प्रथम क्रमांकाची व्यावसायिक उलाढाल असणारी व पहिल्या 5 क्रमांकामधील शेड्यूल्ड सहकारी बँकांच्या तुलनेत बँकेने अग्रगण्य स्थान पटकावले आहे. तर बँकेने सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता 25 हजार कोटींचे व्यवसायवृद्धीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली आहे. त्यांनी सांगतिले की, बँकेने गेल्या वर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये 4,298 कोटींची भरीव वाढ करून 23,752 कोटी व्यावसायिक उलाढाल झालेली आहे. बँकेला नफा 418 कोटी तर 73 कोटी निव्वळ झाला आहे. बँकेच्या एकूण ठेवी 12, 966 कोटी असून 10,785 कोटी कर्ज वितरण केलेले आहे. बँकेची एकूण व्यवसाय उलाढाल 23.752 कोटी झालेली आहे. बँकने या आर्थिक वर्षांत 2,843 कोटी कर्ज वितरीत केले आहे. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले की, बँकेने शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी 9,573 सभासदांना 412 कोटी मुदत कर्ज वितरीत केलेले आहे. शेतकरी सभासदांसाठी बळीराजा कर्ज योजनेच्या अंतर्गत 16 कोटी कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. तर 1417 महिला गटांमार्फत 2047 कोटी कर्ज पुरवठा केलेला आहे. वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या महिला बचत गटांना 4 टक्के व्याजात सूट देण्यात येतो. वेळेवर पीक कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांकडून 3 लाखांपर्यंत फक्त मुद्दल भरून घेतलेले आहे. सदर कर्जावरील व्याज घेतलेले नाही. सदर व्याजाची रक्कम शासनाकडून बँकेस जमा होणार आहे.