‌‘म्हाडा'ही समाजमाध्यमांवर सक्रिय

    26-Apr-2024
Total Views |

mhada 
 
मुंबई, 25 (आ.प्र.) :
 
डिजिटल युगात सर्व प्रशासकीय विभाग, मंत्री, राजकीय पक्ष आणि नेते, कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये आपला आवाका वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच माध्यमातून अनेक प्राधिकरण आणि सरकारी कार्यालये नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या थेट हाताळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ‌‘महाराष्ट्र क्षेत्रविकास आणि गृहनिर्माण प्राधिकरण' (म्हाडा) देखील समाजमाध्यमांवर सक्रिय झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांना थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून ‌‘म्हाडा'शी संपर्क साधता येणार आहे. ‌‘म्हाडा' ही महाराष्ट्र सरकारद्वारे शासित असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्यातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‌‘म्हाडा'ची स्थापना झाली. हे पाहता, ‌‘म्हाडा'ने जाहीर केलेले निर्णय, मोहिमा, घोषणा, गृहनिर्माण योजनांची माहिती घेणे हा नागरिकांचा अधिकार आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याच्या एकमेव उद्देशाने जनसंपर्क वाढविण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीच्या नियुक्तीसाठी ‌‘म्हाडा'ने तब्बल 50 लाखांचे टेंडर जारी केले होते.