माेजून मापून विचारपूर्वक बाेलण्याचे माेल वाढत

    24-Apr-2024
Total Views |
 
 
 
thoughts
 
अविचाराने बाेललेले शब्द तणाव निर्माण करतील वा ताेडण्याचे काम करतील. तुटण्यात मन, व्यवस्था, संबंध वा संघटन काहीही असू शकते. सध्या वर्ड ऑफ माऊथचे जग आहे. अर्थातच ताेंडातून बाहेर पडलेल्या शब्दांचे जग.मी राहत असलेल्या शहरात घडलेल्या दाेन घटना एक धडा बनून जातात. माझा संबंध एका ब्राह्मण समाजाशी आहे.तिथे संघटनेच्या निवडणुकीत अपशब्द, शिवीगाळीचे आराेप झाले.पूर्वी अशा घटनांवर प्रतिक्रियेचे प्लॅटफाॅर्म मर्यादित असत, पण आता साेशल मीडियाचा काळ आहे. येथे सत्यातील तथ्य नव्हे तर समर्थन पाहिले जाते.काही लाेक तर लगेच बाेलू लागतात. एवढी घाई तर स्वत: देवानेही नरसिंह वा हरी अवतार घेण्यातही दाखवली नव्हती.
 
बाेलल्या गेलेल्या शब्दांवर साेशल मीडियात जी प्रतिक्रिया व्य्नत हाेत असते, त्यात असभ्यता, शिवीगाळीसाेबत आराेपाची पद्धतही विषारी हाेत चालली आहे. तेच दुसरी घटना संत समाजात घडली. एका साधूच्या अश्लील शब्दांवर साध्वीचा प्रतिकार श्रद्धा मुळापासून हलवून गेला.एकांतात संतांचे शब्द किती अश्लील हाेते हे तर ताे संत वा देवच जाणतात, पण याच शब्दांवरून क्षमायाचनेमुळे प्रकरण थंड झाले. तसे वातावरण अद्यापही गरमच आहे.कारण साेशल मीडिया ट्रायल चालू आहे ना. एकांतात वा सार्वजनिक रूपात आपल्या शब्दांबाबत अत्यंत सावध राहा. माेजून मापून विचारपूर्वक बाेलाल तरच तुमच्या त्या बाेलांचे महत्त्व वाढेल.