मुलांच्या लेखन-वाचन समस्येवर ‘व्हिजन थेरपी’ उपयु्नत

    24-Apr-2024
Total Views |
 
 

child 
 
दृष्टी आहे म्हणून सर्व काही आहे. हे जग आपण पाहू शकताे, माणसांना ओळखू शकताे, करमणूक करून घेऊ शकताे आणि उदरनिर्वाहसुद्धा त्यावरच अवलंबून आहे. दृष्टी मिळते डाेळ्यांमुळे. ज्ञानेंद्रियांपैकी एक असलेल्या डाेळ्यांचे माेल किती हे त्यातून समजेल. मात्र, सध्याच्या काळात आराेग्याला अपायकारक जीवनशैली, रात्री उशिरापर्यंत जागणे तसेच वाढत्या स्क्रीन टाइममुळे दृष्टिदाेषही वाढत असून, लहान मुलांमध्येही ते दिसायला लागले आहेत. मूल सहजपणे वाचू शकत नसेल आणि त्याला विषय समजण्यात अडचण येत असेल, तर ते दृष्टिदाेषाचे लक्षण असते. मात्र, वेळेवर केलेल्या उपचारांमुळे दृष्टी वाचविता येते. एका महिलेचा अनुभव पाहा. ती म्हणते, की तिच्या 12 वर्षांच्या मुलीला वाचताना समस्या येऊ लागल्या.वाचन कसे करावे हे समजत असले, तरी ती मधील शब्द गाळायला लागली आणि आपण काेठून वाचायला प्रारंभ केला हे समजण्यात तिला समस्या येऊ लागल्या.
 
तिला लेखनातही अडचण येत हाेती आणि दाेन शब्दांमध्ये जागा साेडणे तिला जमत नव्हते. रंग ओळखणे कठीण जाऊ लागले आणि शाळेच्या काळ्या रंगाच्या बॅगमधील त्याच रंगाची वस्तू तिला सापडेनाशी झाली. ही सर्व लक्षणे दृष्टिदाेषाची आहेत हे लक्षात घ्या. शिक्षणात समस्या येणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या गेटवे स्कूल ऑफ मुंबईने यावर ‘व्हिजन थेरपी’ची शिफारस केली. केवळ पाहणे अथवा अक्षरे वाचणे म्हणजे ‘दृष्टी’ (व्हिजन) नाही. आपण जे काही पाहताे, डाेळ्यांना जे काही दिसते त्याचा अर्थ (सेन्स) लावण्याची क्षमता म्हणजे ‘दृष्टी’ अथवा व्हिजन. त्यासाठी डाेळ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याची कला म्हणजे ‘व्हिजन थेरपी.’ यात अनेक घटक येतात. आपले दृष्टिकाैशल्य (व्हिजनस्किल) सुधारणे हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे.मिचेश शिस्मन, मार्जेन टी. कुल्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2020मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘इण्टरव्हेन्शन्स फाॅर कन्व्हर्जन्स इनसफिशिन्सी’ या प्रबंधात दृष्टिकाैशल्य वाढविण्यासाठी ‘व्हिजन थेरपी’ कशी उपयुक्त ठरते याची माहिती दिली आहे.
 
‘या उपचार पद्धतीत आम्ही संबंधितांना डाेळ्यांचा पुरेपूर आणि लवचिक पद्धतीने कसा वापर करावा हे सांगताे आणि त्याचे तंत्रही शिकविताे,’ अशी माहिती न्यूयाॅर्कमधील तज्ज्ञ डाॅ. फ्रान रेइनस्टिन यांनी दिली. गेटवे स्कूल ऑफ मुंबईच्या सल्लागार समितीवरही त्या काम करतात. ‘व्हिजन थेरपी’चे उदाहरण देताना त्या म्हणतात, ‘तुम्ही वाचत असताना डाेळ्यांची हालचाल ओळींनुसार सहजपणाने झाली पाहिजे. मात्र, काही मुलांना खूप जवळचे अथवा लांबचे वाचताना समस्या येतात आणि अशा वेळी ही उपचार पद्धती मदतीला येते.’ या संदर्भात त्यांनी ‘ऑटिझम स्पे्नट्रम’ची समस्या असलेल्या एका मुलाचे उदाहरण दिले. हा मुलगा आठ वर्षांचा असताना त्यांच्याकडे आला हाेता. त्याची एमआरआय तसेच स्कॅन तपासणी झाली; पण त्याच्या डाेळ्यांची तपासणी झाली नव्हती. हा मुलगा डाेळ्यांतील बाहुलीची हालचाल करत नव्हता.
 
तसे करताना त्याला दृष्टी एकाग्र करण्यात अडचण येत हाेती. मात्र, आम्ही त्याच्या डाेळ्यांची तपासणी करून त्याला चष्मा दिल्यावर, काही उपाय सांगितल्यावर ही समस्या कमी झाली आणि नंतर त्याने अभ्यासातही प्रगती केली, असे डाॅ. फ्रान रेइनस्टिन यांनी नमूद केले.‘व्हिजन थेरपी’मुळे या मुलाची समस्या सुटल्याचे त्या म्हणतात. ‘अमेरिकन ऑप्टिमेट्रिक असाेसिएशन’च्या म्हणण्यानुसार, शालेय मुले शिकताना डाेळ्यांचा वापर 80 टक्के करतात. वयाच्या सहाव्या महिन्यातच बाळाची दृष्टी तपासणी करावी आणि नंतर दर वर्षी ती करत राहावी, असा डाॅ. फ्रान रेइनस्टिन यांचा सल्ला आहे. ‘वेळेवर केलेली डाेळ्यांची तपासणी आणि व्हिजन थेरपीमुळे अनेक मुले दाेन्ही डाेळ्यांचा कार्यक्षमतेने वापर करायला लागली आहेत,’ असे त्यांनी सांगितले. मुलांचे डाेळे आणि दृष्टी चांगली राहण्यासाठी पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
 
त्यासाठी मुलांमधील काही लक्षणांकडे बारकाईने नजर ठेवावी. मूल वारंवार डाेळे चाेळत असेल, वाचताना डाेळ्यांवर हात धरत असेल, गृहपाठ करताना तिला-त्याला अडचणी येत असतील, डाेकेदुखीची तक्रार असेल, वाचताना शब्द गाळले जात असतील, पुस्तक डाेळ्यांच्या अगदी जवळ धरले जात असेल आणि वेळेचे व्यवस्थापन जमत नसेल, तर सावध व्हा.
 
ही सर्व दृष्टिदाेषाची लक्षणे असल्याने वेळेवर नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन सर्वंकष तपासणी करणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे याेग्य ठरते. प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार सेशन्स हे ‘व्हिजन थेरपी’चे वैशिष्ट्य असते. डाेळ्यांच्या व्यायामांबराेबरच प्रिझम्स, पॅचेस, फिल्टर्स आणि संगणकावर आधारित प्राेग्राम्सचा वापर यात नेत्रतज्ज्ञ करतात. लाल आणि हिरव्या रंगांचे चष्मे वापरून वाचन करणारी मुले तुम्ही पाहिली असतील. याच रंगांच्या पट्ट्यांचा वापर करून काैशल्य वाढविले जाते. त्यातून त्यांची एकाग्रताही वाढते.जयपूरमधील नेत्रतज्ज्ञ डाॅ. अभिनव महरवाल हे ‘न्यूराे व्हिजन’ आणि ‘व्हिजन थेरपी’च्या क्षेत्रांत काम करतात. ते म्हणाले, ‘केवळ पाहणे म्हणजे दृष्टी नाही आणि त्यात फक्त डाेळेही नाहीत. मेंदू आणि डाेळ्यांची कार्यक्षमता वाढविण्याचे काम व्हिजन थेरपीमध्ये केले जाते.
 
’ बंगळुरूतील रमा अय्यर यांच्या 9 वर्षांच्या मुलाला या थेरपीचा खूप फायदा हाेऊन त्याची विचारक्षमता अधिक वाढल्याचे त्या म्हणतात. ‘व्हिजन थेरपी हे एक शास्त्र असून, लेझी आयसारख्या समस्यांवर ते उपयुक्त ठरते,’ असे डाॅ. महरवाल यांचे म्हणणे आहे.भारतातसुद्धा आता ही उपचार पद्धती स्वीकारली गेली असली, तरी अनेक पालकांना ती माहीत नसल्याचे लक्षात घेऊन इंदिरा बाेदानी यांनी 2014मध्ये गेटवे स्कूल ऑफ मुंबईची स्थापना केली. त्यांच्या मुलाला ‘न्यूराेडायव्हर्सिटी’ची समस्या आहे. वीस वर्षांपूर्वी त्या अमेरिकेत गेल्या असताना त्यांचा ‘व्हिजन थेरपी’बराेबर परिचय झाला.‘माझ्या मुलाला मी डाॅ. फ्रान रेइनस्टिन यांच्याकडे घेऊन गेल्यावर त्यांनी मला व्हिजन थेरपीचे महत्त्व समाजवून सांगितले. आता माझा मुलगा व्यवस्थित वाचू शकताे आणि लक्षही एकाग्र करू शकताे,’ असे इंदिरा बाेदानी या सांगतात.