‘पेड न्यूज’वर बारकाईने लक्ष द्यावे; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

    24-Apr-2024
Total Views |
 
 

Nuws 
 
पेड न्यूज हा संवेदनशील विषय असून, मीडिया सेंटर आणि माध्यम संनियंत्रण व प्रमाणिकरण समितीने या विषयावर बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. माध्यम संनियंत्रण व प्रमाणिकरण समिती, तसेच एक खिडकी सुविधा समितीची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनाेद खिराेळकर, उपजिल्हाधिकारी प्रभाेदय मुळे, अर्चना खेतमाळीस, व्यंकट राठाेड, उपायुक्त अपर्णा थेटे, जिल्हा माहिती अधिकारी डाॅ.मिलिंद दुसाने, माध्यम संनियंत्रण समितीचे सदस्य आकाशवाणीचे वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डाॅ. दिनकर माने, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी ताैसिफ अहमद, जिल्हा परिषदेचे संवाद तज्ज्ञ सतीश औरंगाबादकर, कैलास आहेर, सायबर पाेलिस उपनिरीक्षक विद्या पवार आदी उपस्थित हाेते. तसेच, दूरदृष्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय नाेडल अधिकारी सहभागी झाले हाेते.