एखादी छाेटीशी गाेष्टही आपल्याला संस्मरणीय करून जाते

    23-Apr-2024
Total Views |
 
 

thoughts 
 
 
आपण काेणकाेणत्या गाेष्टींमुळे लाेकांच्या मनात घर करताे या गाेष्टी चकित करणाऱ्या आहेत. विशेषत: नाजुक व कडवट क्षणांमध्ये एखाद्याने आपल्याला कसे सावरले, हे आपण सहजतेने विसरू शकत नाही.औदासीन्याने घेरलेल्या मनाला एक साधा हाेकार वा नकार ही माेठी गाेष्ट ठरते.आपण थाेडे स्वत:कडे व थाेडे आपल्या आजूबाजूला लक्षपूर्वक पाहिले, तर खूप काही समजता व करता येऊ शकते. राेज अनेक प्रभावी कामे ही विनाबाेभाट व विनासायास हाेत राहतात. कधी कधी सहज मानवी माेठेपणाने भरलेली हीकामे करणारे आपण असताे. तर, इतर काेणी आपल्यासाठी करीत असताे.ही छाेटी छाेटी प्रभावी कामे एवढ्या सहज हाेतात की, आपल्याला कित्येकदा आठवतही नाही. पण, पुन्हा तीच गाेष्ट की सहज हाेणेच कित्येकदा सर्वांत कठीण असते.
 
आपण ज्या नात्यात वा पदावर असताे त्याच्याशी संबंधित काही छाेटीमाेठी कामे ही आपली जबाबदारी असते व जी करताे ती स्वत:चीच कामे करीत असताे.त्यासाठी काेणी पाठ थाेपटावी अशी अपेक्षाही करू नका. तेव्हा आपण दुर्लक्ष करून, संकुचित वृत्तीमुळे छाेट्या छाेट्या गाेष्टी करणे टाळत असताे. आणि आपल्या प्रियजनांना दु:खी करीत असताे.लेखिका ल्युमिनिटा डीसेवयुक ही गाेष्ट अशाप्रकारे समजावते, ऑफिसात माेठ्यांचे काम आहे छाेट्यांना सल्ला देणे. आपल्या टीमचे काम साेपे बनवणे वा छाेट्यांच्या चांगल्या कामाची स्तुती करणे. हे सारे करायला हवे, पण करू शकत नाही.जे लीडर छाेटा छाेटा माेठेपणा दाखवण्यात यशस्वी राहतात, त्यांना लाेक आपल्या जीवनात काम शिकवणाऱ्यांच्या रूपात लक्षात ठेवतात.
 
अनेक माेटिव्हेशेनल पुस्तके लिहिलेले जिमी जिगलर म्हणतात, ‘आपण जे इच्छिताे ते आपल्याला मिळाले, त्याची एकच पद्धत आहे की, आपण खूप साऱ्या लाेकांना ते देण्याचा प्रयत्न करा, जे ते इच्छितात. जर आपल्याला इतरांकडून मिळालेली छाेटी छाेटी मदत चांगली वाटते, तर आपणही इतरांना मदत करायला हवी.’ जुनी म्हण आहे की, थाेडे थाेडे करून आपण खूप काही करून जाताे. माेठे असाे वा छाेटे, आपल्या प्रत्येक कामाची गणना हाेत असते. कधी वाचले हाेते की, औदार्य, सहकार्य, माणुसकी हे गुरुत्वाकर्षण बलाप्रमाणेच निसर्गाचे नियम आहेत. जीवन देणाऱ्याला आणखी भरून देते. ते तेव्हा टिकते व वाढते जेव्हा आपण स्वत:ला भाग्यवान आणि कृतज्ञ मानून इतरांना देण्यासाठी तयार राहताे.