उन्हाळ्यात आपल्या शरीराला गारवा द्या

    22-Apr-2024
Total Views |
 
 

health 
 
उष्ण प्रकृतीचे पदार्थ टाळावेत : सामान्यत: सर्वजण ऋतूबदलानुसार आपला आहार व जीवनशैली बदलत नाहीत. आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूनुसार खाण्या-पिण्याचे वर्णन केले गेले आहे.ज्याला ऋतूचर्या म्हणतात.अपल्या देशातील सारेजण उन्हाळ्यातही उष्ण प्रकृतीचे खाद्यपदार्थ खातात. याशिवाय ते चहा, काॅफी, मिरची, लाेणचे, आंबट, तळकट, मास, मद्य व तंबाखूही सेवन करतात. हे पदार्थ ग्रहण केल्यामुळे शरीरात पित्तदाेष वाढताे. यामुळे नायटा, खाज, खरूज, ए्निझमा, मुरमे असे अनेक प्रकारचे त्वचाराेग उत्पन्न हाेतात.
 
त्वचाविकारांपासून सुरक्षा : त्वचेशी संबंधित राेगांपासून वाचण्यासाठी राेज सकाळी रिकाम्या पाेटी कडुलिंबाची 5-6 ताजी पाने खाणे अत्यंत फायदेशीर असते. याशिवाय तीन चमचे घृतकुमारीचा गर खाणेही आराेग्यदायी असते.
 
संक्रमणांचा बंदाेबस्त : उन्हाळ्यात दूषित पाणी प्याल्यामुळे व बाहेरील उघड्यावर कापून ठेवलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पटकी, काॅलरा, टायफाॅइड, कावीळ, आतड्यांना सूज व अनेक प्रकारच्या संक्रमणांच्या केसेस वाढत जातात.यापासून बचावासाठी हे उपायआजमावेत.एक चमचा आवळा चूर्ण जेवणानंतर घेतल्यास जठराग्नी प्रबळ राहताे व पित्तही शांत राहते.सकाळी 4-5 तुळशीची पाने खाल्ल्यासही संक्रमणापासून बचाव हाेऊ शकताे.
 
उन्हापासून सुरक्षा : उन्हाळ्यात उन्हापासून वाचण्यासाठी कॅप, छत्री व गाॅगल घालून बाहेर जावे. जास्त काळ उन्हात काम करणाऱ्यांनी वरचेवर थंड पाणी, गुलाबपाणी, वाळा व चंदनाचे सरबत प्यावे.