धुळ्यात 42 हजार पाेस्टर्स, हाेर्डिंग्ज, बॅनर, झेंडे हटवले

22 Apr 2024 23:55:17
 
 

dhule 
 
धुळे लाेकसभा मतदारसंघात 20 मे राेजी मतदान हाेणार असून, जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गाेयल यांनी दिली. जिल्हा पाेलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बाेडके आदी यावेळी उपस्थित हाेते.आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांत जिल्ह्यात रंगवलेल्या 11029 भिंती, 5499 पाेस्टर्स, 3646 हाेर्डिंग्ज, 5057 बॅनर, 17595 झेंडे असे एकूण 42826रंगवलेल्या भिंतीवरील तसेच पाेस्टर्स, हाेर्डिग्ज, बॅनर व झेंडे काढून टाकण्यात आले. प्रत्येक मतदारसंघात फिरते व बैठे पथक; तसेच आचारसंहिता कक्षात 1950 हा हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहयावर्षी 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
 
जिल्ह्यातील मतदानाची ट्नकेवारी 75 ट्न्नयांपेक्षा जास्त करण्यासाठी मतदार जनजागृतीचे काम जिल्हाभरात सुरू आहे. ईव्हीएम सरमिसळचे काम पूर्ण झाल्याचे गाेयल यांनी सांगितले.जिल्ह्यात आजपर्यंत 38 हजार लिटरपेक्षा अधिक मद्य जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत साधारणत: 67 लाख रुपये आहे. तसेच 27 लाखंपेक्षा अधिकचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
शाप्रकारे गेल्या महिनाभरात 2 काेटी 41 लाखांवर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 2 पिस्तुले, तलवारी आदी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मध्य प्रदेश सीमेवर 6, तर गुजरात सीमेवर 3 अशी एकूण 9 तपासणी नाके कार्यरत करण्यात आल्याचे पाेलीस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0