अवाढव्य ‘हमर’

    22-Apr-2024
Total Views |
 

car 
 
फाेर व्हिल ड्राइव्ह वाहनांमध्ये ‘हमर’ हे वाहन प्रख्यात असून, ‘हमर एच1 ए्नस3’  हे वाहन अतिप्रचंड आकाराचे आहे.नेहमीच्या ‘हमर एच1’ या वाहनापेक्षा हे वाहन आकाराने तिप्पट आहे. संयुक्त अरब अमिरातींचे सर्वेसर्वा शेख हमाद बिन हमादान अल नाह्यान यांच्या मालकीचे हे वाहन 21.6 फूट (6.6 मीटर) उंच, 46 फूट (14 मीटर) लांब आणि 20 फूट (6 मीटर) रुंद आहे. ग्राहकाच्या खास मागणीनुसार तयार करण्यात आलेले  हे वाहन दुमजली असून, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी त्याला आत जिना आहेएक सिंक आणि टाॅयलेटची व्यवस्थाही त्यात आहे. त्याला चार डिझेल इंजिने असली, तरी हे ‘हमर’ ताशी फक्त 32 किलाेमीटर वेगाने धावते. शेख हमाद बिन हमादान अल नाह्यान यांना फाेर व्हिल ड्राइव्ह वाहनांचा छंद असून, त्यांच्या संग्रहात अशी 700पेक्षा जास्त वाहने आहेत!