चीनमध्ये सॅनिटरी पॅडसारख्या दिसणाऱ्या डिझाइनचे रेल्वे स्टेशन

22 Apr 2024 23:54:00
 

Pad 
चीनमध्ये नानजिंग नाॅर्थ रेल्वे स्टेशनच्या डिझाइनची छायाचित्रे साेशल मीडियावर व्हायरल झाली आहेत आणि या विषयावर ऑनलाइन चर्चाही सुरू झाली आहे. सुमारे 231 अब्ज रुपयांच्या या प्रकल्पाचे डिझाइन एका माेठ्या सॅनिटरी पॅडसारखे दिसते आहे.
ज्या कंपनीने हे स्टेशन बनवले, त्या कंपनीचे म्हणणे आहे, की हे शहर मनुका फुलांसाठी जगभरात ओळखले जाते आणि म्हणूनच आम्ही यापासून प्रेरणा घेतली. मात्र, लाेक यावर विश्वास ेवायला तयार नाहीत. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, की हे एक विशाल सॅनिटरी पॅड आहे, हे मनुका फुलांचे आहे असे म्हणणे लाजिरवाणे आहे. अशी रचना तयार करणाऱ्या वास्तुविशारदांची चाैकशी केली जात आहे. हे डिझाइन बघणारे लाेक म्हणतात, की हे सॅनिटरी पॅडसारखे दिसते, आणि हे आर्किटेक्टला समजले कसे नाही? काही वर्षांपूर्वी, चीनची राजधानी बीजिंगमधील एका सीसीटीव्ही कॅमेरा कंपनीच्या मुख्यालयाच्या डिझाइनला ‘बिग बाॅक्सर शाॅर्ट्स’ असे नाव देण्यात आले हाेते.
Powered By Sangraha 9.0