केसांची अशी काळजी घ्या...

    22-Apr-2024
Total Views |
 
 

Hairs 
 
केस पातळ व कमकुवत हाेण्याची अनेक कारणे असू शकतात. सर्वांत मुख्य कारण आहे अपुरे पाेषण. काेणत्याही पाैष्टिक घटकाची कमतरता झाल्यामुळे केसांवर परिणाम हाेऊ शकताे. स्ट्रेसही सर्वांत जास्त प्रभावित करताे. यामुळे स्कल्पमध्येही एक प्रकारचा तणाव येताे. साेबतच याेग्य पाेषण मिळू शकत नाही.खूप दीर्घ आजार म्हणजेच थायराॅइड, ताप, अ‍ॅनिमिया इ.ही कंसांची मुळे कमकुवत करतात. ज्यामुळे केस गळू लागतात. स्कल्प जर ्नलीन नसेल तरी हेअर लाॅसचा प्राॅब्लेम हाेताे. आपल्याकडून घेतल्या जाणाऱ्या डाएटवर केसांचे हेल्दी हाेणे अवलंबून असते. जर आपल्या डेली डाएटमध्ये सर्व पाेषक घटक सुयाेग्य प्रमाणात असतील तर आपले केसही हेल्दी राहतील.
 
केस केराटिन नावाच्या एका ेटीनपासून निर्मित असतात. त्यामुळे प्राेटीनची पूर्तता हाेण्यासाठी दूध, मलई, लाेणी, दही, साेयाबीन, अंडे, चीज, मीट, मासे इ.चे सेवन आवश्यक असते.कित्येकदा व्हिटॅमिन बी, आयर्न, झिंक, काॅपर आणि आयाेडीनच्या अभावामुळेही फाॅलिंग हेअर, ड्राय हेअर आणि कमी वयाात केस पिकण्याची समस्या उत्पन्न हाेऊ शकते. भले काेणताही हेअर प्राॅब्लेम असाे आवश्यक आहे समताेल आहार घेणे. आपल्या रेग्युलर डाएटमध्ये ताज्या भाज्या, ताजी फळे, मेवे, अंडी व दूधाचे पदार्थ सामील करा.
 
हेल्दी केसांसाठी या टिप्स लक्षात घ्या.
 
 केसांच्या मालिशसाठी सरसू वा खाेबरेल तेल वापरा.
 हेअर लाॅस टाळण्यासाठी खाेबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून लावा.
 हवे तर केसांच्या वाढीसाठी कॅस्टर ऑइल हेअर रुट्सवर लावा.
 डल हेअर शायनी बनवण्यासाठी हिना कंडिशनिंग करा. हिना दाेन तास केसांमध्ये लावून ठेवा. सुकल्यानंतर पाण्याने धुवा.त्यानंतर खाेबरेल तेल लावा व दुसऱ्या दिवशी शांपूवाॅश करा.
 शांपूचा वापर आठवड्यात 2-3 वेळापेक्षा जास्त करू ये. माइल्ड हर्बल वा मेडिकेटेड शांपूचा वापर करा.