बाळाच्या सुरक्षिततेसाठी थाेडा सल्ला

    21-Apr-2024
Total Views |
 
 

child 
 
 अवखळ बाळाचा फाेटाे घेता येत नसेल तर बाळाच्या अंगठ्यावर एक सेलाेटेप चिकटवा वा एक-दाेन बाेटांची नखे नेलपाॅलिशने रंगवा. यामुळे बाळ जाेपर्यंत त्याच्याशी खेळण्यात रमेल ताेपर्यंत त्याचा फाेटाे काढून घेऊ शकता.
 
 बाळ जेव्हा दुधाची उलटी करते तेव्हा त्याच्या कपड्यांना नकाेशी दुर्गंधी येते. उलटी पडलेल्या जागी बेकिंग साेडा चाेळल्यामुळे दुर्गंधी त्वरित गायक हाेईल.
 
 बहुतेक मातांचा समज असताे की, बाळाचा स्थूलपणाच उत्तम आराेग्याची खूण आहे, पण हा त्यांचा गैरसमज आहे. लहान मुले त्यांचे संपूर्ण जेवण स्वत:च घेत असतात. त्यामुळे लहान मुलांना लाेणी, साखरयुक्त ज्यूस, बिस्किटे व चाॅकलेट न देता साधा रस वा साधे पाणीच द्यावे.
 
 लहान मुले बऱ्याचदा झाेपेतच लघवी करतात. जर त्यांचे ओले कपडे लवकर बदलले नाहीत तर अंगावर लाल चट्टे उठतात ज्यात जळजळ हाेते.हे टाळण्यासाठी बाळाची त्वचा काेमट पाण्याने पुसावी. नंतर बेबी पावडर शिडकावी.
 
 थंडीच्या दिवसांत मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी वरचेवर गरम सरसू तेलाचे मालिश करणे फायदेशीर असते. सरसूतेलात जायफळ टाकून ते किंचित गरम करून टाळूच्या भागात वेळाेवेळी लावायला हवे.
 
 कधी कधी मुले हानिकारक वस्तू ताेंडात घालतात. अशा स्थितीत मुलांना असे पदार्थ खाण्यास द्यावेत जे त्यांना अजिबात आवडत नसतील.जेणेकरून जाे अंश आत गेला आहे ताे उलटीसाेबत बाहेर येईल. बाळाची जीभही चांगल्याप्रकारे साफ करावी.
 
 जर मुलांची दूध पिण्याची इच्छा नसेल तर त्यांच्यावर बळजबरी करू नये. थाेडा वेळ त्यांना खेळण्यांसाेबत साेडावे, पाच मिनिटे फिरवून आणावे.असे केल्यामुळे त्यांना फ्रेशनेस जाणवेल.अशा मुलांना आपण वेगवेगळे पदार्थ दिल्यास त्यांची खाण्याविषयीची रुची वाढू शकते.