शैलेश काळे यांना वरुणराज भिडे पुरस्कार

    20-Apr-2024
Total Views |

sh 
 
पुणे, 19 एप्रिल (आ. प्र.) :
 
ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळातर्फे देण्यात येणारा वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार ‌‘महाराष्ट्र टाइम्स'चे मुंबई आवृत्तीचे सहायक संपादक समर खडस यांना जाहीर झाला आहे. आश्वासक पत्रकारिता पुरस्कार ‌‘आज का आनंद'चे शैलेश काळे, ‌‘सकाळ'चे डी. के. वळसे पाटील आणि वृत्तवाहिनीतील पत्रकारितेसाठीचा पुरस्कार ‌‘झी 24 तास'चे अरुण मेहेत्रे यांना जाहीर झाला आहे. पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या विश्वस्तांच्या वतीने अंकुश काकडे आणि डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे ही माहिती दिली. येत्या 28 एप्रिलला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर अध्यक्षस्थानी असतील. यंदा ज्येष्ठ पत्रकार अनिल टाकळकर, सत्यजित जोशी यांनी; तसेच वृत्तवाहिनीतील वरिष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन यांच्या निवड समितीने पुरस्काराच्या मानकरींची निवड केली. जयराम देसाई यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. समर खडस 25 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत आहेत.