विमानातून एकट्याने जगप्रदक्षिणा करणारा सर्वांत तरुण वैमानिक

    19-Apr-2024
Total Views |
 
 

record 
अगदी हल्नया वजनाच्या विमानातून (मायक्राेलाइट) जगप्रदक्षिणा करणारा सर्वांत तरुण वैमानिक हाेण्याचा बहुमान मॅक रुदरफाेर्ड (सध्याचे वय 19 वर्षे) याने मिळविला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली. झारा (डावीकडे) ही त्याची बहीण आहे. बल्गेरियातील साेफिया येथून मॅकने 23 मार्च 2022 राेजी या प्रवासाला प्रारंभ केला आणि 24 ऑगस्ट 2022 राेजी प्रवासाची सांगता झाली. पाच खंडांतील 52 देशांना त्याने या काळात भेट दिली. त्यात त्याने दाेन वेळा विषुववृत्त ओलांडले. सुदानच्या वाळवंटातील वाळूची वादळे आणि भारतातील माॅन्सूनच्या आव्हानांना ताे सामाेरा गेला. जपान आणि अमेरिका यांच्या दरम्यानच्या प्रवासात प्रशांत महासागरातील एका निर्मनुष्य बेटावर विमान उतरविणे हा प्रवासातील एक थरारक अनुभव असल्याचे मॅक म्हणताे. त्याचे वडीलही वैमानिक असून, वयाच्या 15 व्या वर्षी मॅकने मायक्राेलाइट विमानाचा परवाना मिळविला. आतापर्यंत त्याने शेकडाे तास उड्डाण केले आहे.